महाराष्ट्र

नांदेडला येणे माझे स्वप्न होते -भगतसिंह कोश्यारी

नांदेड(प्रतिनिधी)-राज्याचा सेवक म्हणून काम करतांना जास्तीत जास्त ठिकाणी जाणे, लोकांशी भेटणे आणि त्यातून कांही शिकणे मला आवडते. मला सर्वात खालच्या स्तरावर जाऊन तेथील पाहणी करणे आणि त्यातून शिक्षण घेणे ही माझी वृत्ती आहे असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील कार्यक्रमात केले.


आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सकाळी नांदेडला आले आणि पहिला कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात झाला. स्वारातीमचे कुलगुरू डॉ.उध्दव भोसले यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे स्वागत केले. व्यवस्थापन परिषदेत भगतसिंह कोश्यारी बोलत होते. लोकांना भेटून कांही शिकल्यानंतर ते इतरांना सांगता येते त्यातून सुध्दा आम्हाला काही मिळत असते असे भगतसिंह कोश्यारी म्हणाले. मध्यंतरीच्या काळात कोविड आला आणि त्याने जाणे-येणे बंद केले. त्यानंतर सुध्दा मी खुप वेळेस प्रयत्न केला आणि जेथे जाता येईल तेथे गेलो. कोविड नियमावलींचे पालन करून मी माझ्या इच्छेनुसार राज्याचा सेवक म्हणून काम करत राहिलो.
मी राज्याचा सेवक झालो नसतो तरी मला नांदेडला येण्याची इच्छा होतीच.श्री गुरू गोविंदसिंघजींच्या स्थानाचे दर्शन घेणे मला आवश्यक होते. श्री गुरू गोविंदसिंघजी, छत्रपती शिवाजी महाराज, चंद्रशेखर आझाद आदी व्यक्ती माझ्यासाठी प्रातस्मरर्णीय आहेत. हे लोक माझ्यासाठी भगवान राम पेक्षा कांही कमी नाहीत. त्यामुळेच मी विचार करत होतो की मला नांदेडला गेलेच पाहिजे. दुर्भाग्यवश भारतातील नागरीकांना कोणी आमच्यासाठी कांही बलिदान केले आहे याची जाणिव नाही. आज आपण स्वतंत्र जगत आहोत पण त्या मागील भुमिका माहित नाही अशा सर्व घटनांना दुर्लक्षीत केले जाते याचे दु:ख व्यक्त केले.
उपस्थित प्राध्यापक मंडळी, व्यवस्थापन समिती सदस्य आणि जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करून भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्याशी चर्चा केली.
यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते एका ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. त्या वृक्षारोपण कार्यक्रमात चलचित्रात राज्यपालांना एक चित्रफित दाखवतांना राज्यपाल म्हणाले मी यावर पाहण्यापेक्षा प्रत्यक्षात पाहु इच्छीतो. असे सांगत कार्यक्रम नसतांना समोरच्या इमारतीतील छतावर जाऊन राज्यपालांनी स्वारातीम परिसराची पाहणी केली. या ठिकाणी नियोजित कार्यक्रमानुसार अल्पसंख्याक मुले आणि मुली यांच्या वस्तीगृहांचे उद्‌घाटन ऐवजी राज्यपालांनी या दोन्ही इमारतींची पाहणी केली. भारतीय जनता पार्टीचे आ.राम पाटील रातोळीकर आणि आ.राजेश पवार यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही राजकीय पदाधिकारी भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यक्रमात आले नव्हते.
रात्रीच खेळ चाले…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा नांदेड दौरा आल्यानंतर कमीत कमी त्यांच्या मार्गावरील खड्डे दुरूस्त करण्याचे काम सुरू झाले. त्यामुळे बऱ्याच रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. गोवर्धनघाट पुलावरील रस्त्यावर करण्यात आलेले काम पाहिले तर त्याची परिस्थिती रात्री झालेले खेळ दिवस उघड पडले अशीच दिसत होती. नांदेडच्या सौभाग्याने या पुलावर उभे राहुन गोदावरी नदी पाहण्याचा मोह राज्यपालांना झाला तर रस्त्यावर केलेली डागडुजी किती बोगस होती हे त्यांना दिसेल. या परिस्थितीमध्ये वजिराबाद पोलीस ठाण्याच्या आत जातांना बराच मोठा खड्डा होता या खड्यात अनेक अपघात होत होते. रस्त्यावरील खड्डे बुजवितांना पोलीसांनी या कामातील कामगारांना विनंती करून आपल्या पोलीस ठाण्यात जातांना असलेला खड्डा बुजवून घेतला हेच या कामाचे सर्वात योग्य काम झाले असे दिसते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *