नांदेड(प्रतिनिधी)-खाकी वर्दीतील गुंड असलेल्या स्थानिक गुन्हा शाखेच पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मुदखेडमध्ये एका व्यक्तीकडून गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतूस पकडले आहे.
दि.4 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार मुदखेड येथील विक्रमसिंह राजपुरोहित मिठाईवाला रा.मुदखेड याच्याकडे एक गावठी पिस्टल आहे. यानंतर त्यांनी आपल्या विभागातील पोलीस अधिकारी पांडूरंग भारती, आशिष बोराटे, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, पोलीस अधिक्षक कार्यालयातील कक्ष क्रमांक 11 चे साहेब गोविंद मुंडे, एक वर्ष वाढीचे प्रतिक्षेत असलेले दशरथ जांभळीकर, मारोती तेलंग,तानाजी येळगे, मोतीराम पवार, बजरंग बोडके, भारत केंद्रे, रुपेश दासरवाड, गजानन बैनवाड यांना मुदखेड येथे पाठविले. या पथकाने तेथे विक्रमसिंह राजपुरोहितकडून एक गावठी पिस्टल आणि एक जिवंत काडतुस जप्त केले.
पांडूरंग भारती यांच्या तक्रारीवरुन मुदखेड पोलीस ठाण्यात विक्रमसिंह राजपुरोहितविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखा पोलीस पथकाचे कौतुक केेले आहे.
