महाराष्ट्र

‘लंगर साहिब’ची कारसेवा भूषनावह; सालाना बरसीनिमित्त संत बाबा कुलवंतसिंघ यांचे गौरोद्गगार

नांदेड(प्रतिनिधी) – ‘लंगर साहिब’च्या संत महापुरुषांचा सेवेचा वसा संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यशस्वीपणे चालवत आहेत. त्यांची हि कार सेवा शीख पंथा सह सर्वांसाठी भूषणावह असल्याचे गौरोद्गगार सचखंड गुरुद्वारा चे मुख्य जथेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ यांनी काढले.

लंगर साहिबचे संस्थापक संत बाबा निधानसिंघ, संत बाबा हरनामसिंघ, संत बाबाआत्मासिंघ व संत बाबा शिशासिंघ कारसेवावाले यांची सालाना बरसी 4 ऑगस्ट रोजी नांदेड येथे लंगर साहिब गुरुद्वारा च्या वतीने मोठया उत्साहाने साजरी करण्यात आली.लंगर साहिबचे प्रमूख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या पुढाकाराने हा उत्सव आयोजित केला होता. बरसीनिमित्त कीर्तन,प्रवचन, रागी जथे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. संत बाबा कुलवंतसिंघ,पंज प्यारे साहेबान, संत बाबा गुरदेवसिंघ शहिदी बाग आनंतपूर साहिब,संत बाबा धालासिंघ मुखी नानक्सर संप्रदाय, संत बाबा जितसिंघ जोहाला,संत बाबा जस्सासिंघ, बाबा सतलानी,आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी उपमहापौर सरदार सरजितसिंघ गिल,गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक सरदार गुरविंदर सिंघ वाधवा यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी संत बाबा कुलवंतसिंघ आशीर्वाद पर बोलत होते.

भारतीय संस्कृतीत गुरूंना अत्यंत आदरणीय स्थान आहे. गुरूची भूमिका समाजाला योग्य दिशा दाखवण्यात यशश्री राहिली आहे असे सांगून संत बाबा नरेंद्रसिंघ यांनी शीख पंथात गुरू ग्रंथ साहिब यांनाच गुरू मानले जाते आणि ते सर्वश्रेष्ठ आणि परिपूर्ण गुरू आम्हाला लाभले आहेत याचा शीख पंथाला गर्व वाटतो असे ते म्हणाले. लंगर साहिब च्या महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करीत कार सेवा सुरू आहे, यासाठी देश विदेशातील संगत सहकार्य करते म्हणून हे महान कार्य अविरत चालू आहे असे संत बाबा बलविंदरसिंघ यांनी सांगितले. या कार्यक्रमात पंजाब काँग्रेसचे सेक्रेटरी सरदार परमजितसिंघ गावद्धी, सरदार परमजितसिंघ घुमान,राणा रणबीरसिंघ पंजाब हॉटेल वाले, सरदार नवजीनदरसिंघ औरंगाबाद,सरदार सुरींदर सिंघ गौरी दुबई,नानक साई फाउंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे,सरदार रूपिंदरसिंघ श्यामपुरा,सरदार जोगिंदरसिंघ मास्टर, सरदार मंजित सिंघ,सरदार जितासिंघ कालो,सरदार इंदरसिंघ मुंबई,पंजाबी लेखक सरदार बलजीतसिंघ ढिल्लो ,सरदार मणबीरसिंघ रणधवा,धनंजय उमरीकर, बाळाजी शेळके, सुभाष बल्लेवार,तुलसीदास भुसेवार, सरदार अवतारसिंघ पहरेदार,सरदार जसदीपसिंघ अरोरा,सरदार गुरूमीत सिंघ विक्रोली,सरदार मिंट्टू सिंघ गवदी,सरदार कुलदिपसिंघ,सरदार राजनीतसिंघ यांच्या सह पंजाब, दिल्ली, हरियाणा, हैद्राबाद मुंबई येथिल भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.