नांदेड

महसुल विभागाकडून अकृषीक कर वसुलीची घेतलेली सुपारी मनपा मागील सहावर्षापासून योग्यरितीने पुर्ण करत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वसामान्य माणसांना भौतिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी असणाऱ्या महानगरपालिकेने मागील सहा वर्षापासून गावठाण क्षेत्रातून महसुल विभागाचा अकृषीक कर वसुल करून देण्याची घेतलेली सुपारी आजही सुरूच आहे. भारताच्या लोकशाहीत सर्वसामान्य माणुस हा केंद्र बिंदू असतांना गावठाण क्षेत्रात राहणारी मंडळी का गप्प बसली आहे हे न समजणारे कोडे आहे.
सर्वसामान्य माणसासमक्ष आम्ही जनतेसाठी काम करतो असे दाखवणारी महानगरपालिका महसुल विभागाकडून घेतलेली एक सुपारी मागील सहा वर्षापासून अंमलात आणत आहे. सन 2016 पासून महसुल प्रशासनाने अकृषीक कराची वसुली करण्याची सुपारी महानगरपालिकेला दिली. त्यात वसुली केलेल्या रक्कमेतील 5 टक्के रक्कम महसुल विभाग महानगरपालिकेला देते. दुसऱ्या महायुध्दातील प्रसिध्द हिटलर हा नेहमीच जनतेवर अन्याय करत होता आणि तो अन्याय सहन करता -करता जनतेचा श्राप हिटलरला लागला आणि त्यामुळे अखेर हिटलरने आत्महत्या केली असा ईतिहास आहे.
महाराष्ट्र महसुल कायद्याप्रमाणे कृषीच्या जमीनीवर ज्या ठिकाणी ती जमीन वाणिज्य उपयोगात आणली. तर त्याला अकृषीक कर लावायची तरतूद आहे. ज्या जमीनीवर लोक घरात राहतात त्या जमीनीला गावठाण असा महसुली शब्द आहे. त्या ठिकाणी राहणारी मंडळी किती वर्षापासून तेथे राहत आहे. याचा अभ्यास महसुल विभागाने करून त्या जमीनीचे रुपांतर गावठाणात करणे ही सुध्दा त्यांचीच जबाबदारी आहे. या कामाशी जनतेचा कांही एक संबंध नाही.
नांदेड शहरातील जुना मोंढा ते जुना पुल हा भाग महसुल विभागाच्या भाषेत गावठाण या सज्ञत मोडतो. या ठिकाणी सुध्दा मालमत्ता धारकांकडून बळजबरीने अकृषीक कर वसुल केला जात आहे. महानगरपालिकेच्या वातानुकूलीत कक्षात बसून जनतेच्या हितासाठी आम्ही राबतो आहोत असे म्हणणारे प्रशासनिक अधिकारी आणि पदाधिकारी यांनी सन 2016 पासून आजपर्यंत एकदाही बेकायदेशीररित्या वसुल होणाऱ्या अकृषीक कराबद्दल “ब्र’ सुध्दा कधी उचारलेला नाही. भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी महसुल विभागाचे प्रमुख असतात. व्यासपीठावर गप्पा मारतांना ही मंडळी सुध्दा भरपूर बोलतात. पण सर्वसामान्य जनतेबद्दल काम करतांना मात्र हिटलरशाही पेक्षा वेगळा दृष्टीकोण कधी दिसला नाही. माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी एका मुलाखतीमध्ये, “आयएएस आणि आयपीएस हे इंग्रजांचे बाप आहेत ‘ असे वक्तव्य केले होते. सुर्यकांत पाटील यांचे हे शब्द अकृषीक कराच्या वसुली संदर्भाने विचार केला तर खरेच वाटतात.
आज तर आणि मागील दहा वर्षापासून कॉंगे्रसची एक हाती सत्ता महानगरपालिकेत असतांना गावठाण क्षेत्रातून अकृषीक कर वसुल करण्याची ही हिटलरशाही सुरू आहे. कॉंगे्रसचे प्रमुख, नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या समक्ष असे घडावे यापेक्षा मोठे दुर्देव ते काय? अशोक चव्हाण यांना त्यांच्या आसपासची मंडळी काय फिड करते यावर सुध्दा सर्वसामान्य जनतेचे भविष्य अवलंबून असते. याही पेक्षा मोठी बाब अशी की, ज्या भारतीय लोकशाहीने आंदोलनाच्या माध्यमातून आपली बाब कशी मिळवावी हे जगाला शिकवले त्या लोकशाहीत नांदेडमध्ये मागील सहावर्षापासून सतत सहन करणारा नांदेड येथील जनसमुदाय किती सहनशिल आहे हे पाहुन त्यांनाच मुजरा करावासा वाटतो.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.