ताज्या बातम्या

ब्रेक द चेन संदर्भाने जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांचे नवीन आदेश

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने कोरोना आपत्तीतुन सुट देतांना काढलेल्या आदेशानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी खंडीभरपेक्षा जास्त संदर्भांचा आधार घेवून 3 ऑगस्ट रोजी ब्रेक द चेन सुधारीत सुचना या सदराखाली कांही निर्बंध शिथील केले आहेत.
दि.3 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी असंख्य जुन्या आदेशांचा संदर्भ देवून नवीन मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. दि.3 ऑगस्ट पासून दिलेल्या या सुचना पुढील आदेशापर्यंत कायम राहतील असे यात नमुद करण्यात आले आहे.
सर्व दुकाने, आस्थापना, अर्थात अत्यावश्यक आणि अत्यावशक नसलेली सर्व दुकाने आस्थापना, शॉपींग मॉलसह दररोज रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील. रविवारी बंद राहतील. शनिवारी अत्यावश्यक दुकाने वगळून हा आदेश आहे. सर्व शासकीय कार्यालय आणि खाजगी कार्यालय पुर्ण क्षमतेने सुरू राहतील. प्रवासाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची होणारी गर्दी टाळाण्यासाठी कार्यालयीन कामाचे तास नियंत्रीत करायचे आहेत. ज्या कार्यालयांची कामे वर्क फॉर्म होम या पध्दतीने सुरू आहेत ती तशीच कायम राहतील. सर्व कृषी विषयक , बांधकाम, औद्योगिक कारखाने, वाहतुक तसेच माल वाहतुक संबंधीत कामे पुर्ण क्षमतेने सुरू राहतील. व्यायामशाळा, केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, स्पा, योगा संेंटर 50 टक्के क्षमतेसह पुर्व सुचना देवून वेळ निश्चित करून सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार दुपारी 3 वाजेपर्यंत यांना मुभा आहे. रविवारी पुर्णता: बंद राहतील. वातानुकूलीत यंत्र लावण्यास बंदी आहे.
सर्व प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील. सिनेमा हॉल, थिएटर, नाट्यगृहे, मल्टीप्लेक्स, मॉल्समधील किंवा स्वतंत्र जागी असतील ते सर्व पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. शाळा व महाविद्यालय राज्य शिक्षण विभागाचे तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार काम करतील. रेस्टॉरंट कोविड-19 नियमांचे पालन करण्याच्या अटीसह, 50 टक्के क्षमतेसह दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी 4 नंतर पार्सल सुविधेला मुभा आहे. जमा बंदी, संचार बंदीमध्ये रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई आहे. वाढदिवस कार्यक्रम, राजकीय, सामाजिक, संस्कृतिक, निवडणुका, निवडणुक प्रचार, रॅलीज, निषेध मोर्चे या पुर्वी दिलेल्या निर्बंधातच राहतील.
या आदेशांची काटेकोर अंमलजबावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी अत्यंत कडक सुचना दिल्या आहेत. या विरुध्द वागणाऱ्यांना भारतीय दंड संहिता, साथरोग प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि फौजदारी प्रक्रिया संहिता यातील कलमानुसार त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कार्यवाही होईल असेही या आदेशात लिहिले आहे.

3 ऑगस्टपुर्वी दुपारी 4 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार या वेळेत दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश होते तरीपण दुकाने रात्री 9 वाजेपर्यंत सुरूच होती. आता रात्री 8 वाजेपर्यंतची परवानगी दिली आहे तर दुकाने 10 वाजेपर्यंत सुरू राहतील यात कांही शंका नाही. कोणालाही कोरोनाची भिती आता शिल्लक राहिलेले नाही असेच दिसते. पण अभ्यासकांनी सांगितलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी विचार करून सर्वांनी कोरोनातील आवश्यक असलेल्या मास्कचा वापर, शारिरीक अंतर, हात वारंवार धुणे या सर्व प्रक्रियांचा अवलंब मनापासून करावा तरच तिसऱ्या कोरोना लाटेला आम्ही योग्य रितीने थोपवू नसता तिसऱ्या लाटेचा प्रहार सहन करण्याची मानसिकता सर्वांनी आपल्या बांधून ठेवायला हवी.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *