क्राईम

अवैधरित्या भुखंडांचा विकास करून श्रीखंड खाणाऱ्या 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर नाका परिसरात अवैधरित्या भुखंडांचा विकास करून विक्री करणाऱ्या सात जणांविरुध्द कांही दिवसांपुर्वीच गुन्हा दाखल झलाा होता. आता पुन्हा एकदा 9 जणांविरुध्द महानगरपालिकेच्या तक्रारीवरुन अवैधरित्या भुखंडांचे श्रीखंड करणाऱ्या 9 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुध्दा तीन महिला आहेत.
महानगरपालिकेचे क्षेत्रीय अधिकारी रावण तुकाराम सोनसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर नाका परिसरात महानगरपालिकेची परवानगी न घेता भुखंडांचा विकास करण्याकरीता रस्त्यांचा बेकायदेशीर लेआऊट तयार करून त्या भुखंडांचे श्रीखंड खाण्याच्या प्रयत्नातील रफत बेगम मजहरुल हक (57) रा.हिमायतनगर, अब्दुल वाहेद अब्दुल वली (52) रा.शिवाजीनगर नांदेड,बिल्कीस बेगम महंमद अब्दुल खुदुस(35)रा.देगलूर नाका, कन्हैयालाल सोनुलाल रा.नांदेड, अब्दुल हाफिज अब्दुल खुुदूस (35) रा.देगलूर नाका, विठ्ठल नागनाथराव कळसकर, अनिल विठ्ठलराव कळसकर, प्रमोद विठ्ठलराव कळसकर, वैशाली हणमंतराव दिनकर सर्व रा.नांदेड या 9 जणांविरुध्द महाराष्ट्र प्रांतीय नगर रचना अधिनियम 1966 च्या कलम 52  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गिते यांच्याकडे देण्यात आला आहे.
भुखंडांचे श्रीखंड करणाऱ्या सहा जणांविरुध्द मागील आठवड्यात सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील बहुतांश मंडळी मोठी व्यापारी आहेत. तरीपण भुखंडांचे श्रीखंड खाण्याची मजा कांही औरच आहे. त्यानुसार हा भुखंडांचा धंदा सुरू असतो. आज कांही अनेक अशा लोकांकडे सुध्दा मोठे भुखंड आहेत ज्यांच्याकडे महानगरपालिका पाहण्याची हिंमत सुध्दा करू शकत नाही. त्यांच्याविरुध्द सुध्दा अशा अवैधरित्या भुखंडांचा विकास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची गरज आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *