फक्त 6 लाख 24 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-हैदरबाग परिसरात चोरट्यांनी दोन घर फोडून 4 लाख 10 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. चिखलवाडी परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी 57 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हदगाव येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 7 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील भाग्यनगर, विमानतळ आणि शिवाजीनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 50 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.
सय्यद एजाज हुसेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान हैदरबाग परिसरात त्यांचे घर आणि त्यांचे शेजारी डॉ.जवादउल्लाह खान यांचे घरफोडून चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम 72 हजार आणि 79 ग्रॅम सोन्याचे दागिणे असा एकूण 4 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पेालीसंानी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक गणेश गोटके अधिक तपास करीत आहेत.
सुखज्योत कौर ईश्र्वरसिंघ गिरनीवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास कोणी तरी चोरट्यांनी घराचा कडीकोंडा काढून आत प्रवेश केला. कपड्यात ठेवलेली कपाटाची चाबी शोधून कपाट उघडून त्यातून सोन्या-चांदीचे दागिण आणि रोख रक्कम असा 57 हजारांचा ऐजव चोरून नेला आहे. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक माळी हे अधिक तपास करीत आहेत.
आवाळा ता.हदगाव येथील बालाजी बाबाराव पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 ऑगस्टच्या सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान ते आणि त्यांचे शेजारचे इतर लोक घराला कुलूप लावून शेतात काम करण्यासाठी गेले असता कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पत्र्यावरून आत उतरून कुलूप कोंडा तोडला आणि घरातील पेटीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.
सुभाष दिगंबर डोईफोडे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.0417 ही 30-31 जुलैच्या रात्री ज्ञानेश्र्वरनगर नांदेड येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 10 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.
संजय गुरवाजी चिकनेकर यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एल.1413 ही 20 हजार रुपये किंमतीची गाडी 25 जुलै रोजी रात्री शिवाजी कॉम्प्लेक्स शारदानगर येथून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
श्रीराम प्रविण गादेवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 एफ 991 ही 1 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट या रात्री चोरीला गेली आहे. ही गाडी अलीभाई टावरच्या पाठीमागे उभी होती. या गाडीची किंमत 20 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार गोटमवाड हे अधिक तपास करीत आहेत.
