क्राईम

20 लाखांचे किटक नाशक औषधी चोरणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)- नवा मोंढा भागातील शेती साहित्य विकणाऱ्या एका दुकानातून नोकरांनी 20 लाख 3 हजार रुपयाचे किटक नाशक चोरले. ही तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हा शाखाने दोन जणांना पकडले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.पी.घोले यांनी दोघांना चार दिवस, 6 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
नवा मोंढा भागात सचिन सिड्‌स कंपनी नावाची दुकान आहे. याचे मालक सचिन उर्फ राजू शिवप्रसाद तोष्णीवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे नोकर असलेले माधव सावंत आणि संतोष रावणवेणी यांनी 1 ऑगस्ट 2021 च्या पुर्वी कधी तरी त्यांच्या दुकानातील आणि गोडाऊनमधील शेती साहित्य उपयोगी असलेले किटक नाशक औषधी किंमत 20 लाख 3 हजार रुपये असे साहित्य चोरून नेले आहे.
शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 290/2021 कलम 381 आणि 34 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्याकडे देण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हा शाखेने माधवराव रामराव सावंत (28)रा.चंद्रलोक हॉटेलसमोर गोविंदनगर नांदेड आणि संतोष राधेशाम रावणवेणी (28) रा.मामा गॅरेजच्या पाठीमागे मित्रनगर नांदेड या दोघांना पकडले.
आज 2 ऑगस्ट रोजी पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार शंकर मैसनवाड, रवि बाबर आणि शंकर केंद्रे यांनी पकडलेल्या सावंत आणि रावणवेणी यांना न्यायालयात हजर केले. यांनी चोरलेला किटक नाशक साठा जप्त करणे आहे. यासाठी पोलीस कोठडी मागितली. न्यायाधीश आर.पी.घोले यांनी दोघांना 6 ऑगस्ट 2021 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणात या दोघांशिवाय आणखी कोणी चोर आहेत काय याचा शोध घेण्यात येईल आणि योग्य कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सांगितले.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *