नांदेड

माजी आ.नागनाथरावजी रावणगावकर यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी) नांदेड शहरातील ‘आयटीआय’ चौकाशेजारील ‘एच.आय.जी’ कॉलनीतील रहिवासी व मुखेड-देगलूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नागनाथराव सटवाजीराव रावणगावकर (वय-७२ वर्षे) यांचे २ ऑगस्ट रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले.
नांदेड जिल्ह्यातील ‘मुखेड-देगलूर’ विधानसभेचे (१९८० ते १९८४) या कालावधीमध्ये आमदार राहिलेल्या नागनाथराव रावणगावकर यांच्या पार्थिव देहावर सोमवार दि.२ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता नांदेडच्या ‘गोवर्धन’घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ पदाधिकारी माजी आमदार दिवंगत नागनाथराव रावणगावकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना,दोन मुली, जावई, नातवंडे, भाऊ, भावजय, पुतण्या व पुतने असा परिवार आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.