नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड महानगरपालिका क्षेत्रातील बौध्द बहुल वस्त्यांमध्ये असलेल्या मुलभूत सुविधा संदर्भाने एका चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीतील बौध्द वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सहभागी होवून आपले विचार मांडावे असे आवाहन राहुल सोनसळे यांनी केले आहे.
नांदेड शहरातील भागाच्या राहणाऱ्या विविध बौध्द बहुल वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांना मिळणाऱ्या सुविधा या बाबत आपसात विचारांची देवाण-घेवाण व्हावी म्हणून दि.3 ऑगस्ट रोजी स्नेहनगर भागातील देवगिरी विश्रामगृह येथे एका चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बौध्द बहुल वस्त्यांमध्ये असलेल्या बहुतीक सुविधा, नागरीकांना खऱ्या अर्थाने असलेली गरज आणि प्रतिक्षात मिळणाऱ्या बहुतीक सुविधा या संदर्भाने चर्चा होणार आहे. नांदेड शहरात, महानगरपालिकेच्या हद्दीत असणाऱ्या सर्व बौध्द बहुल वस्त्यांमधील नागरीकांनी या चिंतन बैठकीत सहभागी व्हावे आणि आपल्या वस्तीमध्ये प्राप्त असलेल्या भौतिक सुविधा आणि प्रत्यक्षात हव्या असाणऱ्या भौतिक सुविधा याबाबत आपले विचार मांडावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचेे राहुल सोनसळे, ऍड.यशोनिल मोगले, आतिश ढगे, अभय सोनकांबळे यांनी केले आहे.
