नांदेड(प्रतिनिधी)-सामजिक कार्यकर्ते बिरबल बिरजू यादव यांनी महानगरपालिका नांदेड आणि कलामंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कोरोना लसीकरण शिबिरात 324 नागरीकांनी पहिला व दुसरा डोस घेतला.
तिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका पाहता केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी नागरीकांच्या लसीकरणासाठी सर्व सुविधा दिल्या आहेत. भारतातील सर्व नागरीकांना लसीकरण झाले पाहिजे यासाठीच बिरबल यादव यांनी पुढाकार घेवून कलामंदिर येथे कोरोना लसीकरण शिबिर आयोजित केले होते. मनपा उपआयुक्त अजितपालसिंघ संधू, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन, डॉ.कुंटूरकर यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. या शिबिरात एकूण 324 नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला.
या प्रसंगी बिशनकुमार यादव, बिल्लू यादव, रामेश्र्वर तिवारी, किशोर यादव, धिरज यादव, दिलीपसिंघ सोढी, संजय शर्मा, आनंद बामलवा, राम महाजन राऊत, किशोर वागदरीकर, अभिजित पाटील, श्रीकांत पाठक, संतोष यादव, राजेश यादव, गोकुल यादव, आकाश खरे, किरण यादव, डॉ.मानसी अहिर, अंबादास जोशी, कपिल यादव, शक्ती ठाकरे, किशोर ठाकूर, कपील लोंढे, आर्या तुम्मा, कैलास बरंडवाल, राहुल बनसोडे, गजानन भगत, गणेश बिरकुले, धिरज यादव, सुरज यादव, हिरा चौधरी, अमोल देवके, मारोती पाटील शिंदे आदी उपस्थित होते.
