नांदेड(प्रतिनिधी)- भारतीय सैन्यात 17 वर्ष आपल्या सेवा देवून सेवानिवृत्त झाल्यानंतर परतलेले गोविंद निलपत्रेवार यांचे रेल्वे स्थानकावर जोरदार स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या मातृभुमिच्या सेवेत रुजू झालेले गोविंद निलपत्रेवार यांनी 17 वर्ष भारतमातेची सेवा करून आज सेवानिवृत्ती घेवून परत नांदेडला आले. रेल्वे स्थानकावर विर सैनिक गु्रपच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या उघड्या जिपमध्ये बसवून गाडीला तिरंगे झेंडे लावून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. सैनिकी वेशात परतलेले गोविंद निलपत्रेवार यांना आपल्या स्वागताला पाहुन आनंद झाला. देशाची सेवा करणाऱ्या अशा प्रत्येक व्यक्तीचा सन्मान भारताच्या प्रत्येक नागरीकाने करायला हवा. आजच्या कार्यक्रमात अर्जुन नागेश्र्वर, जयश भरणे, प्रथमेश जोशी, सत्या सुरवार, साई कदम यांच्यासह सध्या सुट्टीवर असलेले अनेक भारतीय सैनिक उपस्थित होते. हा सन्मानाचा सोहळा पाहणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांनी सुध्दा गोविंद निलपत्रेवार यांना अभिनंदन केले आहे.
