

नांदेड(प्रतिनिधी)-आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये अर्धापूर न्यायालयात 35 प्रकरणे निकाली निघाली आणि दाखल पुर्व प्रकरणांमध्ये 39 लाख 97 हजारांची वसुली करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड यांच्या मार्गदर्शनात अर्धापूर न्यायालयात कोविड नियमावलीचे तंतोतंत पालन करून राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पक्षकार आणि विविधिज्ञांनी भरपूर प्रतिसाद दिला. आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये बॅंक, महावितरण कंपनी यांच्यावतीने दाखल पुर्व प्रकरणे तसेच महिला कौटूंबिक हिंचार कायद्यातील फौजदारी आणि दिवाणी प्रकरणे सामोपचाराने संपावीत यासाठी प्रयत्न करण्यात आला.
एकूण 35 प्रकरणे यात निकाली झाली आणि 39 लाख 97 हजार रुपये संबंधीत पक्षकारांना मिळतील म्हणून वसुल करण्यात आली.
अर्धापूरचे न्यायाधीश मंगेश बिरहारी यांच्या अध्यक्षतेत ऍड.डी.बी.दासे, ऍड. ए.आर.चाऊस यांनी पॅनल जज म्हणून काम केले. न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक एम.एम.शेंवडकर व इतर कर्मचारी डी.जी. सूर्यवंशी, एस.एस.कोरेवाड, ए.आर.यन्नावार, एस.बी.इंदूरकर, शेख अख्तर शेख सय्यद, के.एम.मोहिते, पी.एम.गुंडे, श्रीमती एस.एस.माने आणि पोलीस पैरवी अधिकारी आर.डी.घुले यांनी परिश्रम घेतले.