नांदेड

शेख जाकेर शेख सगीरचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

नांदेड(प्रतिनिधी)-एका प्रकरणात पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला असेल तर त्या तत्वावरच दुसऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्याची गरज नसते असे आपल्या आदेशात लिहुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी शेख जाकेर शेख सगीरची गुन्हा दाखल करण्याची मागणी फेटाळून लावली आहे.
शेख जाकेर शेख सगीर या महान समाजसेवकाने दुर्गादास बापूराव कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या खोट्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली. असा अर्ज भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिला होता, पोलीस अधिक्षकांना सुध्दा दिला होता. यामध्ये स्वातंत्र्य सैनिक नागोराव रामदास कोळनुरकर हे दुर्गादास कुलकर्णीचे काका आहेत असे दाखवून ती नोकरी मिळवल्याचा शेख जाकेर शेख सगीरचा आरोप होता. याबाबत पोलीस ठाणे भाग्यनगर आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांनी काही दखल घेतली नाही म्हणून न्यायालयात ओएमसीए 801/2021 हे प्रकरण दाखल करण्यात आले. या प्रकरणाला ओएमसीए क्रमांक 306/2021 ची जोड देण्यात आली. त्या प्रकरणात भारतीय प्रक्रिया संहितेच्या कलम 156(3) प्रमाणे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. म्हणून ओएमसीए क्रमांक 801 मध्ये सुध्दा गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा अशी मागणी करण्यात आली .
न्यायालयाने दाखल केलेल्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून ओएमसीए क्रमांक 306 हे प्रकरण 801 सारखेच नाही. प्रत्येक खटल्याचा निर्णय देतांना त्याची आपली स्वत:ची पात्रता असते. कोणी त्या सारखे मला द्या असा दावा करू शकत नाही, असे आपल्या निकाला नमुद केले आहे. सोबतच या प्रकरणात पोलीस कोठडीतील तपासाची गरज न्यायालयाला वाटली नाही. या प्रकरणात दत्तक पत्रक आणि शपथपत्र नोकरी देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांनी स्विकारले आहे. त्यामुळे पोलीसांच्या हाताने पुरावा जमा करण्याची कांही गरज या प्रकरणात नसल्याचे न्यायालयाने नमुद केले आहे. क्रमांक 306 आणि 801 मधील परिस्थिती वेगळ्या आहेत. म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. याप्रकरणी शेख जाकेरची बाजू ऍड. शेख इब्राहीम यांनी मांडल्याची नोंद ऑनलाईन अभिलेखात दिसते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *