नांदेड

नांदेडच्या QRT पथकाने एका अतिरेक्याला घातले कंठस्नान

 
एकाला जिवंत पकडले;प्रवाशांची केली सुटका 
नांदेड विमानतळावर घडलेला थरार 
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्याच्या जलद प्रतिसाद पथकाने (क्युआरटी)ने आज दुपारी अतिरेक्यांनी विमान हायजॅक करून कांही प्रवाशी नागरीकांना ओलीस ठेवले होते. अशा परिस्थितीत क्युआरटी पथकाने एकाला कंठस्नान घालून एकाला जीवंत पकडले. हा सर्व रंगीत तालीमेतील प्रकार होता.
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृह पोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, स्थानिक गुन्हा शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस विभागातील जलद प्रतिसाद पथक(क्युआरटी)  ने नांदेड विमातळावर नियोजनबद्ध  पध्दतीने अतिरेकी कोठे आहेत, त्या ठिकाणी कसे जाता येईल, पोलीस प्रवाशी कसे सोडवता येतील या बाबतचा एक आलेख जलदगतीने तयार केला आणि क्युआरटीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मुंजाजी दळवे, प्रशिक्षक शंकर भारती, धनराज पुरी यांच्यासह २ क्युआरटी जवानांनी एका अतिरेक्याला कंठस्नान घातले आणि एकाला जीवंत पकडून प्रवाशांची सुखरुप सुटका केली. हा सर्व घटनाक्रम रंगीत तालीम (डेमो) होता. क्युआरटी पथकाने अतिरेक्यांवर हल्ला केल्यानंतर परिस्थिती बिघडली तर क्युआरटी जवानांना पाठबळ देणारा प्लॅन बी तयार ठेवून पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर त्यांच्या मदतीसाठी हजर होते. अचानक प्रसंगी उद्भवणार्‍या मदतीसाठी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलीस निरिक्षक अंकुशे,गुट्टे  त्यांच्या विभागातील इतर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी विमानाची घातपात विरोधी तपासणी कार्यवाही पुर्ण केली. 
या मॉकड्रील डेमोसाठी मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने, विमानतळचे संचालक राजेश जीवन, सुरक्षा अधिकारी अमरदिपसिंघ  हे हजर होते. या परिस्थितीत बंदोबस्त करण्यासाठी विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे, विमानतळ सुरक्षा पथकाचे पोलीस निरिक्षक सावने यांच्यासह इतर पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार आणि दंगल नियंत्रण पथकाचे एक प्लॅटुन हजर ठेवण्यात आले होते. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *