नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने बदल्यांसाठीची 31 जुलैपर्यंतची मुदत अगोदर 10 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. आता ही मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. मागील वर्षी सुध्दा अशाच प्रकारे बदल्यांच्या मुदतीला अनेकदा वाढ देण्यात आली होती. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयावर उपसचिव गिता कुलकर्णी यांची डिजिटल स्वाक्षरी आहे. वारंवार मुदतवाढ या प्रश्नावर एखादी कार्यशाळा आयोजित करावी लागेल.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील कोविड-19 परिस्थितीला अनुसरून मागील वर्षी सप्टेंबरपर्यंत सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना मुदत वाढ दिली होती. आता यावर्षी अगोदर 30 जुलै, त्यानंतर 10 ऑगस्ट त्यानंतर 14 ऑगस्ट आणि आता 30 ऑगस्ट अशी चौथ्यांदा बदल्यांसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे.
25 टक्केपर्यंत मर्यादेपर्यंत सर्वसाधारण बदल्या करायच्या आहेत. त्यासाठी 9 ऑगस्ट 2021 ही तारीख देण्यात आली आहे. त्यानंतर विशेष कारणास्तव करायच्या बदल्या 10 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट या वेळेत करण्यासाठी नवीनच मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी बरचे नियम या शासन निर्णयात लिहिले आहेत. पण बदल्या करणे हा महत्वाचा विषय आहे. कारणे तर सगळीच मान्य होत असतात. कारण बदली करणारा सक्षम अधिकारी आणि बदली घेणारा व्यक्ती या दोघांमध्ये सामंजस्य असते. त्यामुळे हे सर्व घडणार आहे. आज 29 जुलै रोजी शासनाने हा निर्णय जारी करून नवीन मुदत वाढ दिल्याने ज्यांना आपल्या मनासारखी बदली हवी त्यांना सुध्दा प्रयत्न करण्यासाठी मुदत वाढणार आहे. शासनाने जारी केलेला हा निर्णय संकेतांक क्रमंाक 202107291609425507 या नुसार राज्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.
