महाराष्ट्र

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी साधला चिखलीकर कुटुंबियांशी दिलखुलास संवाद

जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर पंतप्रधान मोदी व खा. चिखलीकर यांच्यात अर्धा तास चर्चा

नांदेड(प्रतिनिधी)- देशाचे पंतप्रधान यांच्या समवेत जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर तब्बल एका दशका नंतर चर्चा झाली असावी.आणि ते जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घडवून आणली आज (गुरुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
प्रतापरावांनी भेट घेतलीं. नांदेडला एम्स हॉस्पिटल उभारावे, नांदेड- बिदर रेल्वे मार्ग, नवीन रेल्वेमार्ग तसेच नवा उद्योग उभारण्यात या प्रमुख विषयावर प्रतापराव पाटील यांनी पंतप्रधान यांच्याकडे मागणी केली तसे लेखी निवेदन दिले.पंतप्रधाना सोबत जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. पंतप्रधानानी या सर्व विकास मागणीची नोंद घेतलीं असून ही भेट अविस्मरणीय होय निश्चितच जिल्ह्याच्याविकास कामना गती मिळेल असे खा चिखलीकर यांनी आवर्जून सांगितले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात सकाळी साडे अकरा वाजता जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट घेतली बैठकीतही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील विविध विकास प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रतापरावांनी थेट संवाद साधला .नांदेडमध्ये नवीन भारतीय आयुर्विज्ञान (अखखचड) हॉस्पिटल सुरू करावे. जेणेकरून तेलंगणा -कर्नाटक या सीमावर्ती राज्याला त्याचा फायदा होणार आहे शिवाय. ,नांदेड-बिदर रेल्वेचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, तसेच बोधन-मुखेड- लातूर रोड नवीन कामांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे .जिल्ह्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता नांदेड जिल्ह्यात नवीन उद्योग सुरु करण्यात यावा. नांदेड-चंदीगड व्हाया दिल्ली ही विमान सेवा सुरु करावे या प्रमुख मागण्यासह जिल्ह्याच्या विकास प्रश्नावर सविस्तर चर्चा झाली. तब्बल एका दशका नंतर नांदेड जिल्ह्याच्या विषयावर थेट पंतप्रधानाकडे चर्चा झाली. ते प्रतापरावांमुळे शक्य झाले .सद्‌तयासद्या सुरु असलेली परिस्थिती पाहता पंतप्रधानांचे दैनंदिन कार्यक्रम भरगच्च असतानाही त्यांनी वेळातला वेळ काढून खा.चिखलीकर याना पंतप्रधान मोदीजी यांनी वेळ दिला .जिल्ह्याचे विकास प्रश्न जाणून घेतले व ते सोडविण्याचे आश्वासन दिले .यत्यामुळे प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत . संसद भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत . खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्या सोबत त्याच्या सौभाग्यवती.प्रतिभाताई चिखलीकर, कन्या सौ.प्रणिताताई देवरे- चिखलीकर -, युवा नेते जि प सदस्य , प्रविण पाटील चिखलीकर स्नुषा , सौ.वैशाली प्रविण पाटील स्नुषा , डॉ.सौ.माया प्रमोद पाटील, नातू चि.अर्णव चि.राजविर चि.अरुष , चिरंजीव विहान , असा परिवार होता.. .नातवंडांना प्रत्यक्ष मोदीजी पाहून नवलच वाटले. आरंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चिखलीकर कुटूंबियानी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन स्वागत केले. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर जि.प.सदस्या प्रणिता देवरे-चिखलीकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. लेकरांना खाऊ दिले.पंतप्रधान नरेंद्र मोद यांच्याशी जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या विकास प्रश्नावर चर्चा झाल्या नंतर चिखलीकर कुटुंबियांशी दिलखुलास संवाद साधला.आस्थेवाईकपणे विचारपूस केली विशेष म्हणजे पंतप्रधान मोदीजी यांनी मराठीतुन चिखलीकर परिवाराशि संवाद साधलासोबत झालेल्या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कुटुंबीयांशी मुक्तपणे संवाद साधला . प्रत्येकाची असतेवाईकपणे विचारपूस करून संवाद साधला.कोरोना काळातील नांदेड जिल्ह्यातील भाजप ने केलेल्या सेवाकार्य पुस्तिका देण्यात आली ती पाहून नांदेड जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षानी केलेल्या कार्याची प्रशंसा पंतप्रधानानी केली.अर्धा तासाहून अधिक वेळ झालेली बैठक अविस्मरणीय ठरली.मतदार संघाच्या व जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर देशाच्या पंतप्रधानां सोबत आपणास चर्चा करता आली .याचे भाग्य लाभले पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदारांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे असे नमूद करत खा चिखलीकर यांनी पंतप्रधान मोदीजी यांच्याशी झालेली चर्चा व त्यांची भेट अविस्मरणीय होय नांदेड आणि मराठवाड्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील अशा विश्वास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. असे खा प्रतापराव पाटील यांनी सांगितले. मागील दहा वर्षात जिल्ह्याच्या विकासाठी पंतप्रधाना सोबत ही जिल्ह्याच्या खासदाराची पहिलीच भेट असावी

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.