क्राईम

अवघ्या १४४ तासात विक्की ठाकूरचे आठ मारेकरी एलसीबीने पकडले

नांदेड,(प्रतिनिधी)- २० जुलै रोजी विक्की ठाकूर चा खून करणाऱ्या ८ मारेकऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या कुशल नेतृत्वात नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने अवघ्या ७ व्या दिवशी गजाआड केले आहे.पकडलेल्या अनेक जणांवर या पूर्वीचे सुद्धा खून,दरोडे असे गुन्हे नोंदवलेले आहेत.अवघ्या १४४ तासात  ८ मारेकऱ्यांना जेरबंद करण्याची यशश्वी कामगिरी स्थानिक गुन्हा शाखेने करून दाखवली आहे.
                       आज दिनांक २८ जुलै रोजी बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती देण्यात आली.या वेळी  पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे आदी उपस्थित होते.
               नांदेडच्या गाडीपुरा भागात  २० जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास विक्की दशरथसिंह ठाकूर (३२) या युवकावर मुसलमान व्यक्ती आपल्या डोक्यावर धारण करतात अश्या टोप्या घालून ७ जणांनी हल्ला केला.त्यात विक्की ठाकूरच्या डोक्यात गोळी मारून त्याच्या शरीरावर अनेक जखमा तलवारीने करण्यात आल्या.त्यावेळी सुरज भगवान खिराडे आणि निखिल उर्फ कालु मदने सुद्धा विक्की ठाकूर सोबत होते. इतवारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा क्रमांक १७६/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३०७,१२० (ब) सह अनेक कलमे आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कालमानूसारचा सुरज खिराडेच्या तक्रारीवरून दाखल झाला.त्यागुन्ह्याचा तपास इतवाराचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्याकडे देण्यात आला.
                      या तक्रारीतील मारेकरी यादीत असणारय्रा दोन महिला अंजली नितीन बिघानिया आणि ज्योती जगदीश बिघानिया याना प्रथम अटक झाली.त्यांना पोलीस कोठडी आणि चार दिवसांनी न्यायालयीन कोठडी मिळाली. या गुन्ह्याच्या तपासात असलेले गांभीर्य ओळखून पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यावर मारेकऱ्यांना शोधण्याची जबाबदारी दिली.आपल्या अधिकाऱ्यांच्या हाकेला अत्यंत जलद ओ असा प्रतिसाद देत द्वारकादास चिखलीकर त्याचे सहकारी सहायक पोलीस निरीक्षक संकेत दिघे,पांडुरंग भारती,पोलीस अंमलदार गोविंद मुंढे,दशरथ जांभळीकर,संजय केंद्रे,बालाजी तेलंग,तानाजी येळगे,बालाजी यादगीरवाड, मोतीराम पवार,महेश बडगू,राजू पुल्लेवार,बालाजी मुंढे आदींनी स्थानिक पोलिसांची मदत घेत अत्यंत बारकाईने अभ्यास करून सापळा लावला आणि एकाच झटक्यात आपल्या बंदुका भरून चवथ्या मजल्यावरील खोलीत प्रवेश केला.
                     त्याठिकाणी नितीन जगदीश बिघानिया, लक्ष्मण उर्फ लक्की बालाजी मोरे पाटील,दिगंबर उर्फ डीग्या टोपाजी काकडे,मुंजाजी उर्फ जब्या बालाजी धोंडगे,सोमेश सुरेश कत्ते,मयुरेश सुरेश कत्ते,कृष्णा उर्फ गब्या छगनसिंह परदेशी,तानाजी उर्फ ताना शंकर चव्हाण असे आठ जण सापडले.  त्यांना पुढील तपासासाठी इतवारा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले जाणार आहेत.या घटनेतील अनेक सत्य अद्याप बाहेर येणे शिल्लक आहे.
कालू मदने घर का भेदी नव्हे
विक्की ठाकूरचा खून झाल्यानंतर दिनांक २६ जुलै रोजी निखिल उर्फ कालु मदने यास ताब्यात घेतले होते.ते कश्यासाठी याबाबत वेगवेगळ्या चर्चा झाल्या.त्यात एक चर्चा अशी पण होती की कालू मदने हा घर का भेदी या सदरातील आहे.तो विषय आम्ही प्रश्न चिन्हासह आणि पोलीस तपासातील प्रक्रियेसह छापला होता.आज या सात मारेकऱ्यांना अटक झाल्या नंतर कालू मदनेचा सहभाग घर का भेदी या सदरातील नाही हे स्पष्ट झाले आहे.त्याला पोलिसांनी का ताब्यात घेतले याचे रहस्य पोलीस तपासात समोर येणारच आहे. आज तरी निखिल मदने हा विक्कीचा मित्रच आहे असे दिसते.
        पोलीस दलातील ‘मीर सादिक’ आणि ‘मीर जाफर’
नांदेड जिल्ह्यात आल्यावर काही ‘मीर सादिक’ मला असे चालणार नाही,हे नको,ते नको म्हणत होते.मीच नांदेडचा पोलीस अधीक्षक असल्याच्या तोऱ्यात वावरत होते.पण विक्की ठाकूरचा खून झाल्यावर कोणी काय करायला हवे याचे धडे आपल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देत होते.सोबतच पोलिसांनी ताब्यात घेतलेला निखिल उर्फ कालू मदने यास सोडण्याची शिफारस करत होते.कालू मदनेचा इतिहास त्यांना माहित असेल असे त्यावरून वाटते.कारण ‘मीर सादिक’ सोबत भारताच्या वाईट इतिहासात ‘मीर जाफर’ हे नाव सुद्धा उल्लेखित आहे. या दोघांमुळेच इंग्रजांना भारतात येण्याची संधी मिळाली होती.तसेच टिपू सुलतान या धुरंधर योध्याला इंग्रजांसोबत लढतांना वीर मरण आले होते.आणि बंगालचे नवाब सिराजउदौला यांना सुद्धा मरण प्राप्त झाले होते अशी इतिहासात नोंद आहे.
                अश्या मीर सादिकांना पकडलेले आरोपी त्यांच्याच हद्दीत आणून ठेवलेत याची माहिती पण प्राप्त झाली नाही,आपल्या ‘करवल्यांच्या’ मदतीने दुसऱ्याच्या भाकरीवरील तूप आपल्या भाकरीत ओढून घेण्याची ‘किमया’ मात्र त्यांना चांगलीच येते हे आता काही लपून राहिलेले नाही.
काळजाच्या तुकड्या पेक्षा कर्तव्याला महत्व
द्वारकादास चिखलीकर यांची औरंगाबाद येथे 23 जुलै रोजी एन्जोग्राफी झाली. 24 जुलै रोजी ते नांदेडला परत आले.त्याच दिवशी पोलीस उप महानिरीक्षकाचे आदेश मिळताच कामावर रवाना झाले.रस्त्यात त्यांच्या काळजाच्या तुकड्याला दवाखान्यात भरती करण्याची वेळ आली.सध्या आज ही ती बालिका दवाखान्यात आहे,अद्याप तिची सुट्टी झालेली नाही.पण आपले कर्तव्य आपल्या मुली पेक्षा जास्त मोठे समजून द्वारकादास चिखलीकर यांनी कर्तव्य अगोदर पूर्ण करतांना ‘आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे’ हे तानाजींचे वाक्य पूर्ण करून दाखवले आहे.याबाबत पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी द्वारकादास चिखलीकरसह सर्व अधिकारी आणि पोलीस अमलदारांचे कौतुक केले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *