क्राईम

बिलालनगरच्या जवळच जुगार अड्यावर धाड ;विमानतळ पोलीसांची कामगिरी

नांदेड (प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस निरिक्षकांनी काल रात्री बिलालनगर भागात चालणाऱ्या एका जुगार अड्यावर छापा मारुन पाच जणांना पकडले आहे. त्यांच्याकडून 8 हजार 560 रुपये रोख रक्कम आणि दीड लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. पकडलेल्या पाच जणांमध्ये एमआयएम पक्षाचा कार्यकर्ता आहे.
काल दि.26-27 जुलैच्या रात्री विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे हे आपल्या पथकासह गस्त करत असतांना बिलालनगर भागात एका ठिकाणी छापा मारला. गुन्ह्यातील मजकुरानुसार हा जुगार अड्डा सांगवी शिवारात आनंदा दशथ तिडके यांच्या शेताच्या मोकळ्या जागेत सुरू होता. बिलालनगर हा भाग तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विभागलेला आहे. त्यातील शेवटच्या भागात हा जुगार अड्डा सुरू होता. जो पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता.
त्या ठिकाणी महंमद शाहेद महंमद शोकत (38) रा.रहेमतनगर, मिर युसूफ अली मिर मुख्तार अली (37) रा.देगलूर नाका, महंमद इमरान उर्फ इब्राहिम अब्दुल वाहब(39) रा.बिलालनगर, सय्यद फसीयोद्दीन बकीयोद्दीन (47) रा.रहेमतनगर, शेख आवेज शेख संदलजी (33) रा.जुनाभट्टी देगलूरनाका अशा पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून 8 हजार 650 रुपये रोख रक्कम आणि दीड लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या असा एकूण 1 लाख 58 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 239/2021 मुंबई जुगार कायदा कलम 12 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार विक्रांत देशमुख हे करीत आहेत. 
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *