क्राईम

तीन चोऱ्यांमध्ये 99 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)- बिलोली येथे चाकूचा धाक दाखवून 2 हजार रुपये लुटण्यात आले आहेत. देगलूर शहरातून एक दुचाकी आणि पाण्याची मोटार चोरी गेली आहे. झोपलेल्या माणसाच्या खिशातील 50 हजार रुपये आणि 15 हजारांचा मोबाईल लोहा नांदेड रस्त्यावरील कारेगाव जवळच्या पेट्रोलपंपावर घडला आहे. या चोरी प्रकारांमध्ये 99 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
शेख सुलेमान शेख अहेमद हुसेन यांनी दिेलेल्या तक्रारीनुसार 26 जुलै रोजी मध्यरात्री ते घरात झोपले असतांना एक दरोडेखोर घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील 2 हजार रुपये लुटले आहेत. बिलोली पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
गंगाधर हणमंतराव कोरेगावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे भक्तापुर ता.देगलूर दि.24 जुलै रोजीच्या रात्री 10 ते 25 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान त्यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.के.7812 ही 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी  आणि एक सात हजार रुपये किंमतीची पाण्याची मोटार असा 32 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलसी अंमलदार पल्लेवाड हे अधिक तपास करीत आहेत.
राजेभाऊ दत्ता तिडके रा.पिंपळवाडा ता.धारुर जि.बीड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आणि त्यांचे मित्र 26 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यात आले त्यांना रात्रीचा उशीर झाला होता. ऊस तोड कामगारांना देण्यासाठी त्यांनी सोबत 50 हजार रुपये आणले होते. उशीर झाल्याने ते कारेगाव जवळच्या ओमसाई पेट्रोलपंपावर झोपले झोपेत असतांना त्यांच्या खिशातील 50 हजार रुपये आणि त्यांचा मित्र महादेव याच्या खिशातील 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा 65 हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.