नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या एका विवाहितेने औरंगाबाद येथे राहणाऱ्या आपल्या सासरच्या मंडळीविरुध्द दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय दंड संहिता आणि मुस्लीम महिला(विवाहच्या अधिकाराचे संरक्षण) कायदा 2019 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात विवाहितेचा सासरा वकील आहे.
नांदेड येथे राहणाऱ्या एका 26 वर्षीय विवाहितेने इतवारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 25 जुलै रोजी 11 वाजेच्यासुमारस तिच्या माहेरच्या घरी येवून सय्यद आबेद सय्यद जावीद, सासरा ऍड. सय्यद जावीद काझी,सासू इफतफिरदोस, नणंद सारा सय्यद, दुसरी नणंद राहिन सरुराज या सर्वांनी व्यवसासाठी 15 लाख रुपये माहेरहुन आणावेत म्हणून तिचा छळ केला. तसेच तिचा नवरा काझी आबेद यांनी व्हॉटसऍपवर तलाख-तलाख-तलाख असे शब्द लिहुन मला सोडून दिले आहे. या पुढे तुझा माझा काही एक संबंध नाही असे ही लिहिले आहे. इतवारा पोलीसांनी या बाबत गुन्हा क्रमांक 178/2021 कलम 498(अ), 34 आणि मुस्लीम महिला कायदा 2019 च्या कलम 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.
