नांदेड(प्रतिनिधी)- जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जमिन खरडली गेली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, पशुधनाचे नुकसान झाले आहे आणि घरांची पडझड झाली आहे. अगोदरच कोरोनाने आर्थिक अडचण असताना शेतकऱ्यांवर आलेला हा प्रभाव अत्यंत दुर्देवी आहे. राष्ट्रीय आपत्ती योजनेअंतर्गत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत मिळवून द्यावी असे निवेदन नांदेडच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मौन्टीसिंघ जहागीरदार आणि शहराध्यक्ष अब्दुल शफीक यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.
