नांदेड

वंचित बहुजन आघाडीचे नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी निवेदन

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील काही वस्त्यांमध्ये असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्रासाचे निवारण करण्यासाठी मनपा प्रशासकीय इमारत, पालकमंत्र्यांचे निवासस्थान किंवा आयटीएम कॉलेज सारख्या इमारतीत त्रासालेल्या नागरिकांच्या निवासाची सोय करण्यापासून पर्याय राहणार नाही, अशा आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडीने अशोक चव्हाण पालकमंत्री नांदेड यांच्यासह मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिले आहे.


मनपा निवडणूक 2017 च्या प्रचारात अशोक चव्हाण यांनी समस्त नागरिकांना केलेल्या विनंतीनुसार पक्षाकडे न बघता माझ्याकडे पाहून मतदान करावे, तुमच्या सर्व समस्या सोडविण्याची मी जबाबदारी घेतो, या वचनाच्या आधारेच आजचे निवेदन आम्ही देत आहोत, असे या निवेदनात लिहिले आहे. शहरातील प्रभाग क्र. 11, 12 आणि 18 ज्या विभागात मिल्लतनगर, ममतानगर, इस्लामपूरा, इम्रान कॉलनी, अब्बासीनगर, गुलजार बाग, लक्ष्मीनगर, एकबालनगर, तेहरानगर, नारायणनगर, सादकनगर, सैलाबनगर, दुलेशाहनगर, तहुरा बाग, नवीन ईदगाह रस्ता या विभागात राहणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक परिसरामध्ये पावसाळ्याचे तोंेडावर रस्ते खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. विद्युत पुरवठा अयोग्य होतो. ड्रेनेज पाणी लोकांना त्रासदायक आहे. खड्‌ड्यांमध्ये पडून अपघात होत आहेत. या सर्व त्रासाची लवकरात लवकर सोय केली नाही तर तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल असे या निवेदनात लिहिले आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे फारूख अहेमद, विठ्ठल गायकवाड, अयुब खान पठाण, इशान खान, रऊफ लाला, अब्दुल सत्तार, अहेमद पठाण,  शेख रहीम, शेख सादीक, आदित्य देशमुख, नोमान खान यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *