नांदेड(प्रतिनिधी)- येथील गुरुद्वारा लंगर साहिबच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सालाना बरसी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून ४ ऑगस्ट रोजी नांदेड (नगीना घाट) येथे हा उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवानिमित्ताने पंजाब येथून अनेक संत महापुरुष व भक्त मंडळी येणे अपेक्षित आहेत.
यावर्षीची बरसी २,३,४ ऑगस्ट या दरम्यान नगिना घाट येथील लंगर साहिब गुरुद्वारा मध्ये साजरी होणार आहे. लंगर साहिबचे संस्थापक संत बाबा निधानसिंघजी, संत बाबा हरणामसिंघजी, संत बाबा आत्मासिंघजी व संत बाबा शीशासिंघजी कारसेवावाले यांची सालाना बरसी साजरी करण्यात येनार आहे. लंगर साहिबचे प्रमुख जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या मार्गदर्शननाखाली हा उत्सव साजरा होतो आहे. बरसी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कीर्तन,प्रवचन, रागी जथे, लंगर महाप्रसाद आदी कार्यक्रमाचा या उत्सवात समावेश राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सचखंड गुरुद्वारा चे मुख्य पुजारी सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ व पंचप्यारे साहेबांन,संत बाबा गुरूदेवसिंघ शहिदीबाग आनंदपूर साहिब,गुरुद्वारा बोर्डाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन गुरुद्वारा लंगर साहिब चे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ व संत बाबा बालविंदरसिंघ यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याही वर्षी भाविकांची उपस्थिती आणि कोरोना आपत्तीची सर्व नियमाचे पालन करत उत्सव साजरा केला जाणार आहे. लंगर साहिब गुरुद्वाराच्या सालाना बरसी उत्सवाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. लंगर साहिब गुरुद्वाराच्या सेवा नांदेडकरांसाठी भूषण आहेत. सालाना बरसी या उत्सवाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. देश विदेशातुन भावीक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खास करून येत असतात असे संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांनी सांगितले. दरम्यान बरसीच्या निमित्ताने दि 3 आणि 4 ऑगस्ट रोजी नगीना घाट येथील संत बाबा निधान सिंघ जी मेमोरियल हॉस्पिटल च्या वतीने मोफत दन्त चिकित्सा आणि फिजियोथेरेपी शिबिराचे आयोजन केले जात आहे.
नांदेड,(प्रतिनिधी)- आज कोरोना विषाणूने एकूण 11 नवीन कोरोना बाधीत रुग्ण दिले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 122 आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी 97.26 झाली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहिती नुसार आज दि.19 फेबु्रवारी रोजी कोरोना बाधेने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तुपशेलवाडी ता.देगलूर पुरूष (वय 44) असे मरण पावणाऱ्या कोरोना […]
नांदेड,(प्रतिनिधी) – आज मंगळवारी ६३१ तपासणीत सहा नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३१आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०२ अशी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज सहा नवीन कोरोना रुग्ण सापडले आहेत. मनपा गृह […]
नांदेड(प्रतिनिधी)- येथिल गुरुद्वारा लंगर साहिब द्वारा चालवल्या जाणाऱ्या नागिना घाट च्या संत बाबा निधानसिंघ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डिजिटल एक्स-रे मशीन ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. लंगर साहिब गुरुद्वाराचे मौजुदा मुखी नांदेड भूषण संत बाबा नरेंद्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघ यांच्या हस्ते या डिजिटल एक्स-रे मशीनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी डॉ हरजींदर सिंघ,बाबा अमरजीतसिंघ टाटावाले, […]