क्राईम

मोबाईल लिंकवर फसवणूक करून दोघांची 1 लाख 21 हजार 895 रुपयांची फसवणूक

कॉलकरून बोलले असता बोलणारा एसबीआय बॅंक सांगत आहे, शाखा विचारली तर अर्वाच्य बोलत आहे
नांदेड(प्रतिनिधी)-मोबाईलवर एसएमएस लिंग पाठवून त्यांच्या बॅंक खात्यातील पैसे गायब केल्याचे प्रकार पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे नोंदवले गेले आहेत. दोन प्रकरणांमध्ये 1 लाख 21 हजार 895 रुपये ठक्कांनी गायब केले आहेत. या मोबाईलनंबरची तपासणी केली असता एसबीआय बॅंकेतून बोलतो असे सांगून बोलणारा माणुस अर्वाच्च भाषेत बोलत आहे.
वृंदावन कॉलनी येथे राहणारे प्रविण वृंदावन सोनी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जुलै रोजी मोबाईल क्रमांक 6297344174 वरून त्यांना एसएमएस पाठवून लिंकद्वारे प्रविण सोनी यांची माहिती घेवून एसबीआय बॅंके शाखा गुरूद्वारा येथील त्यांच्या बचत खात्यातून 71 हजार 895 रुपये ठकसेनाने काढून घेतले आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 416, 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(सी), 66(डी) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे हे अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत यशवंतनगर भागातील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश जीजाभाऊ शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलै रोजी सकाळी 10.40 वाजता त्यांच्या मोबाईलवर मोबाईल क्रमांक 6290259642 यावरून कॉल आला आणि बीएसएनएल कंपीनमधून बोलतो आहे असे सांगून लिंक पाठवून त्याची ओटीपी मागितली आणि प्रकाश शिंदे यांच्या बॅंक खात्यातून 50 हजार रुपये काढून घेतले.  या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 416, 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(सी), 66(डी) नुसार गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक आनंदा नरुटे हे अधिक तपास करीत आहेत.


वर्तमान पत्रातून, बॅंकांद्वारे या अशा एसएमएस, लिंक, फोन कॉलला प्रतिसाद देवू नये असे आवाहन वारंवार केले जाते. पोलीस विभाग सुध्दा जनतेला याबद्दल नेहमी जागृत करत राहतो. तरीपण अशा एसएमएस, लिंक आणि कॉलला लोकप्रतिसाद देतात शिवाजीनगर येथे दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये एक फिर्यादी सेवानिवृत्त शिक्षक आहेत, एक फिर्यादी व्यापारी आहेत. तरीपण त्यांनी अशा भामट्या लिंकला प्रतिसाद देवून आपलेच नुकसान करून घेतले आहे.
बातमी लिहिण्याअगोदर मोबाईल क्रमांक 6297344174 ला ट्रु कॉलर ऍपवर तपासले असता ते एसबीआय बॅंक असे नाव दाखवत आहे. दुसरा मोबाईल क्रमांक 6290259642 तपासला असता ट्रु कॉलरवर त्याचे नाव राहुल शर्मा दाखवते. 6297344174 या मोबाईल क्रमांकावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला सुरूवातीला अत्यंत आदराने एसबीआय बॅंकेतून बोलतो असे बोलणारा सांगत होता. कोणत्या शाखेत हा क्रमांक आहे अशी विचारणा केली असता तो अर्वाच्य भाषेत बोलू लागला. याचा अर्थ गुन्हे करणारे सायबर गुन्हेगार कोणाला भित नाहीत असेच दिसते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.