नांदेड

थकीत एफआरपीसाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर स्वातंत्र्यदिनी आंदाेलन -प्रल्हाद इंगोले

नांदेड(प्रतिनिधी)- भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने  जुलैच्या शेवटपर्यंत थकीत एफआरपी रक्कम न दिल्यास पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर  कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व शेतकर्यांना घेऊन आंदोलन   करण्याचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते तथा ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी दिला आहे . एक ऑगस्टपासून या अांदाेलनाच्या तयारीसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील गावागावात जाऊन आंदोलक आंदोलनाची तयारी करण्यात येणार असल्याचे इंगोले यांनी सांगितले .
 
   राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणा-या  भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने  मागील अनेक वर्षे सोबत यावर्षीची ही एफआरपी थकवली आहे.  गतवर्षी कारखान्याने चार पैकी दोन युनिट विकले अशोकराव चव्हाण मंत्री झाले त्यामुळे  यावर्षी  तरी भाऊराव कारखाना एकरकमी एफआरपी देईल असे सर्वांना वाटत होते. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली . वारंवार मागण्या करून निवेदन देऊनही कारखाना व प्रशासन  शेतकऱ्यांना थकीत एफआरपी मिळवून देत नसल्यामुळे पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर  सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व शेतकर्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. एक ऑगस्ट रोजी या आंदोलनाच्या तयारीसाठी गावागावात जाऊन सर्वपक्षीय लोकांना एकत्र करून  पालकमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाची जोरदार तयारी करण्यात येणार आहे. सरकारमधील वजनदार मंत्री असलेल्या अशोकराव चव्हाण यांच्याच कारखान्याने एफआरपी थकवल्याने  नांदेड विभागातील इतर कारखानेही शेतकर्यांना वेळेवर पैसे देत नाहीत  त्यामुळे साखर आयुक्त कार्यालयाला कार्यवाही करायची म्हटलं तर पहिल्यांदा भाऊराववर कार्यवाही करावी लागेल त्यामुळे प्रशासन कोणावरही काहीही कार्यवाही करीत   त्यामुळे प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे .
पालकमंत्र्यांनी  गतवर्षी दिलेला शब्द होता
  गतवर्षीही थकीत एफआरपीसाठी  पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन  करण्यात येणार होते लोकप्रतिनिधींना घेऊन आंदोलनाची जोरदार तयारी देखील करण्यात आली होती परंतु प्रशासनाने मध्यस्थी करून  त्या वेळी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक घेऊन त्यांनी मध्यस्थी केली  होती. पालकमंत्र्यांचा मान राखून गतवर्षी त्यांच्या घरासमोरील आंदोलन आम्ही मागे घेतले होते . त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द काही अंशी पाळला होता.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *