नांदेड

देवानंद हनमंते यांच्या स्मृतीदिनी रक्तदान शिबिर संपन्न

नांदेड(प्रतिनिधी)-दहा वर्षापूर्वी आपल्या मित्राची हत्या झाल्यानंतर त्याच्या आठवणीत गेली नऊ वर्ष रक्तदान शिबिर घेण्याचा संकल्प राहुल सोनसळे आणि त्यांच्या मित्र परिवाराने घेतला आणि आज त्याच पार्श्र्वभूमीवर त्रिरत्न विहार डॉ.आंबेडकरनगर येथे रक्तदान शिबिर पार पडले.
या शिबिराचे उद्‌घाटन कैलास सावते , नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी केले. अनेक रक्तदात्यांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवून आपला मित्र देवानंद हनमंते यांना श्रध्दांजली अर्पण केली. जीवन आधार रक्तपेढीने आजच्या रक्तदान शिबिरात आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने शिबिर यशस्वी केले. शिबिराच्या सुरूवातीला तथागत गौतम बुध्द आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.


यावेळी कैलास सावते, प्रा.राजू सोनसळे, नगरसेवक संदीप सोनकांबळे, प्रशांत सोनकांबळे, अजित हटकर,राहुल सोनसळे, प्रतिक मोरे, बंटी गायकवाड,माधव चित्ते, राहुल चिखलीकर, समिंदर वाघमारे, अशोक पंडीत,कंथक सुर्यतळ, राहुल घोडजकर, ऍड. यशोनिल मोगले,कुणाल हटकर,अतुल गायकवाड, सोनु शंकपाळ,बंटी सोनकांबळे,सुभाष कांबळे, अतिश ढगे,रवि बनसोडे, प्रबुध्द चित्ते,पिंटू गायकवाड, स्वप्नील सरोदे, स्वप्नील बुक्तरे, रुपेश सोनसळे, राधे सुर्यतळ, अतुल चौंदते, मोनु वाघमारे, चेतन सरोदे, दक्षक सरोदे, भूषण सावंत, सुबोध गजभारे, भैय्या पाईकराव यांच्यासह अनेक जणंाचा सहभाग होता. आजच्या रक्तदान शिबिरात एकूण 110 रक्त बाटल्या जमा झाल्या त्या जीवन आधार रक्तपेढीला देण्यात आल्या.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.