नांदेड

कोरोनाने मयत झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे; प्रल्हाद इंगोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

नांदेड(प्रतिनिधी)-कोरोना आजारामुळे  मृत पावलेल्या शेतकर्यांच्या नावे असलेले कर्ज शासनाने माफ करून त्यांच्या कुटूंबियांना  आधार द्यावा अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

       कोरोना आजाराच्या संकटकाळात फ्रंट वर्कर म्हणून अनेक घटकांनी काम केले त्या सर्वांची शासनाने व समाजाने नोंद घेतली . परंतु शेतकर्यांकडे मात्र दुर्लक्षच करण्यात आले . लॉकडाऊनच्या काळात सर्व इंडस्ट्री बंद असताना शेतकऱ्यांनी शेती पिकवणे बंद केली नाही त्यानी नफ्या तोट्याचा विचार न करता  सर्वांना पुरेल एवढे अन्नधान्य भाजीपाला निर्मिती केली. अशा अन्नदात्या शेतकर्यांना ही कोरोना आजारांमुळे जीव गमवावा लागला. कोरोनामुळे मृत पावलेल्या शेतकर्यांना शासनाची कसल्याही प्रकारची मदत झाली नाही त्यामुळे सरकारने मृत शेतकर्यांच्या नावे असलेले कर्ज माफ करून त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्याचे काम करावे अशी मागणी शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी एक निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *