महाराष्ट्र

नांदेड येथील एकूण 21 सहाय्यक सरकारी अभियोक्ता आता अतिरिक्त सरकारी अभियोक्ता

नांदेड(प्रतिनिधी)-काल महाराष्ट्रातील 210 सहाय्यक सरकारी अभियोक्त्यांना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावर शासनाने पदोन्नती दिली. त्यात नांदेड येथील आज सेवेत असणारे पाच वकील आणि नांदेड येथे काम करून इतरत्र काम करणारे असे एकूण 21 वकील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या एका याचिकेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाला धारेवर धरल्यानंतर महाराष्ट्र शासनाने 210 सहाय्यक सरकारी अभियोक्तांना पदोन्नती दिली. त्यामध्ये आज नांदेडमध्ये कार्यरत असलेले ऍड. बी.एम.हाके, ऍड. सुनंदा चावरे, ऍड. रमेश लोखंडे, ऍड. अविनाश येगावकर, ऍड.शैलजा पाटील यांच्यासह अगोदर नांदेडमध्ये कार्यरत असलेले आणि आता दुसरीकडे सेवेत असलेले 16 वकील या पदोन्नतीस पात्र ठरले आहेत.
अगोदर नांदेडमध्ये कार्यरत असलेले आणि अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदोन्नती प्राप्त करणारे इतर वकील मंडळी पुढील प्रमाणे आहेत. सुहास सुधाकर कुलकर्णी, शोभा दुर्गादास देशमुख, मिलिंद माधवराव नेरलीकर, देवयानी मधुकर सरदेशपांडे, नामदेव नथुजी पवार, अनिल गंगाधर येरेकर, राजकुमार माचेवार, सुर्यकांत माणिकराव सोनटक्के, लिना कुलकर्णी, बाळासाहेब लोमटे, मोहम्मद अब्बास मोहम्मद हैदर, संजय दुर्गादासराव देशमुख, ज्योती लक्का, बंडू नागोराव आढाव, अनुराधा शिवराज ढावकरे, गजानन खिल्लारे, प्रविण बुलबुले आणि जयजयराम सुर्यवंशी असे आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *