नांदेड

व्यथा डॉ.आंबेडकरनगरच्या नागरीकांची..

नांदेड(प्रतिनिधी)-पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या शेजारी राहणाऱ्या डॉ.आंबेडकरनगर भागातील जनता गेली तीन दिवस 18 तास विना विजेच्या जगत आहे. पाऊस पडल्याने या भागातील साफसफाईचे पितळ उघडे पडले आहे. एका घरामध्ये तर गुडघ्या पर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे या भागातील नागरीकांना सध्या तरी जगणे अवघड झाले आहे. डॉ.आंबेडकरनगर भागात पालकमंत्र्यांचे शेजारी असतांना हा भाव महानगरपालिकेचा आहे तर शहरातील इतर वस्त्यांबाबत मनपा काय काम करत असेल हा प्रश्न समोर येत आहे.

आज दि.23 जुलै हा तिसरा दिवस असा उजाडला आहे की, डॉ.आंबेडकरनगर भागातील विद्युत पुरवठा सकाळी 6 वाजता बंद होतो तो रात्री 12 वाजता सुरू होतो. डॉ.आंबेडकरनगर भागातील नागरीकांना यामुळे आराम अवघड झाला आहे. पावसापुर्वी करायच्या कामांना वीज वितरण कंपनीने हुल दिल्यामुळे डॉ.आंबेडकरनगर भागातील विद्युत पुरवठा खंडीत होण्याची प्रक्रिया अशा पध्दतीने सुरू आहे. डॉ.आंबेडकरनगर भागात पावसाळ्यापुर्वी नाली सफाई झाली नाही त्यामुळे जोरात पडलेल्या पावसाचे पाणी नाल्यांमधून वाहिले नाही. त्याचा परिणाम एका घरात तर गुडघ्या ऐवढे पाणी साचून झाला. सोबतच रस्त्यावर टाकली जाणारी घाण उचण्यासाठी लाखो रुपये देवून कंपन्या काम करत आहेत. पण डॉ.आंबेडकरनगर भागात कचरा उचलण्यासाठी कोणीच येत नाही त्यामुळे डॉ.आंबेडकरनगर भागात कचऱ्यांचे ढिग साचले आहेत. त्यामुळे रोगराई पसरण्याची भिती सुध्दा डॉ.आंबेडकरनगर वासियांना आहे. वीज वितरण कंपनीचे डी.पी.डॉ.आंबेडकरनगर भागात उघडेच आहेत. डॉ.आंबेडकरनगर भागातील लहान बालकांना खेळण्यासाठी कोणते मैदान नाही म्हणून त्या भागातील रस्तेच बालकांसाठी खेळण्याची जागा आहे. उघडे डी.पी.कधी काय दुर्घटना घडवतील याचाही कांही एक नेम सांगता येणार नाही.


डॉ.आंबेडकरनगरमधील नागरीकांनी सांगितले की, पालकमंत्री अशोक चव्हाण आमचे शेजारी आहेत असे व्यासपीठावरून फक्त निवडणूकीत सांगतात. पण आज डॉ.आंबेडकरनगरमधील परिस्थिती पाहिली असता त्यांच्या शेजारी राहुन आम्हाला काय फायदा असा प्रश्न डॉ.आंबेडकरनगरमधील नागरीक विचारत आहेत. डॉ.आंबेडकरनगरतील एक नगरसेवक महापौर आहेत. सोबतच इतर तीन नगरसेवक आहेत पण कधीही महापौर किंवा नगरसेवकांनी डॉ.आंबेडकरनगर भागात काय परिस्थिती आहे हे पाहण्याची साधी तसदी सुध्दा घेतलेली नाही.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *