नांदेड

बोधन-मुखेड-लातूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यासह नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम सुरू करा

खा.चिखलीकरांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे मागणी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड- बिदर या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही त्यामुळे नांदेड -बिदर रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे यासह बोधन -मुखेड – लातूर या नव्या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे . खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली .या भेटीत त्यांनी ही मागणी केली .
नांदेड जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत . कोरना महामारीच्या संकट काळात बंद झाली झालेली रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर नांदेड आणि मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेच्या दर्जेदार सुविधा मिळाव्यात ,जास्तीत जास्त रेल्वेगाड्यांची सोय व्हावी या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे सातत्यपूर्ण प्रयत्न करीत आहेत. खासदार निवडून आल्यानंतर प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी अगदी पहिल्याच टप्प्यात नांदेड- बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न सोडवून घेतला . हा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. नांदेड- बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू झाले नसल्याने हे काम तात्काळ सुरू करण्यात यावे यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री व आश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली .

या भेटीत नांदेड- बिदर रेल्वे मार्गाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसह बोधन -मुखेड -लातूर या नव्या मार्गाला मंजुरी द्यावी त्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण सुरू करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, रॉयल सीमा एक्सप्रेस नांदेड पर्यंत सुरू करावी ,राज्यराणी एक्सप्रेसला अधिकचे डब्बे वाढवावेत आदी मागण्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांच्याकडे केल्या . शिवाय रेल्वेच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत आणि अडीअडचणींच्या बाबतीत रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे संघर्ष समिती ,रेल्वे विकास समिती आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलविण्यात यावी त्या बैठकीत या सर्व अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करावेत अशी मागणीही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली . रेल्वेच्या अडीअडचणी आणि प्रश्न सोडविण्याबाबत लवकरच रेल्वे प्रवासी संघटना, रेल्वे संघर्ष समिती, रेल्वे विकास समिती आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात किंवा अधिवेशन संपल्यानंतर निश्चितपणे घेतली जाईल असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला आहे . त्यामुळे येत्या काही काळात मराठवाड्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील रेल्वे चे विविध प्रश्न मार्गी लागतिला असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *