या पत्रावर ‘करीता’ लिहुन स्वाक्षरी केली
नांदेड(प्रतिनिधी)-आत्मदहनाचा अर्ज देणाऱ्या नितीन गजानन सावंत बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षकांना पत्र देवून पोलीसांनी तो मुद्देमाल विकला व वाटून घेतल्याप्रकरणी संबंधीतांवर कठोर कारवाई करावी अशा आशयाचे पत्र पोलीस अधिक्षक नांदेड यांना पाठविले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रावर जिल्हाधिकारी नांदेड करीता असे लिहुन स्वाक्षरी करण्यात आली आहे.
श्रावस्तीनगरमध्ये राहणाऱ्या नितीन गजानन सावंत यांच्या घरी नोव्हेंबर 2020 मध्ये चोरी झाली. त्यात जवळपास लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या संदर्भाने पोलीसांनी 12 चोरट्यांना पकडले होते. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पोलीसांनी नितीन सावंतला दाखवला होता. दाखवलेल्या मुद्देमालापैकी बऱ्याच वस्तु माझ्या असतांना मला मिळाल्या नाहीत असा अर्ज नितीन सावंत यांनी दिला होता. त्यावर कार्यवाही झाली नाही म्हणून नितीन सावंतने जिल्हाधिकाऱ्यांना 7 जुलै रोजी एक निवेदन दिले त्या निवेदनानुसार माझा चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा तसेच तो मुद्देमाल परसपर पोलीसांनी विकला आणि वाटून घेतला प्रकरणी कार्यवाही करावी नसता मी आत्मदहन करेल असा इशारा त्या निवेदनात देण्यात आला होता.
या निवेदनाला अनुसरून जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधिक्षकांना एक पत्र पाठवले. त्यानुसार असे करणाऱ्या संबंधितांविरुध्द कार्यवाही करावी तसेच नितीन सावंतला आत्मदहनापासून परावृत्त करावे असे या पत्रात लिहिले आहे. या पत्राची प्रत नितीन सावंत यांना देण्यात आली असून त्यांनी आत्मदहन करण्याचा मार्ग अवलंब न करता पोलीस अधिक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा या पत्रावर जिल्हाधिकारी नांदेड करीता असे लिहुन त्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. करीता हा शब्द लिहुन स्वाक्षरी करण्यास शासनाने बंदी टाकली आहे. तरीपण करीताचे प्रकार सर्रास सुरूच आहेत.
