नांदेड

शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हास्तरीय चित्र रेखाटन स्पर्धा

 नांदेड (प्रतिनिधी)- राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शांतिदूत प्रतिष्ठान कंधारच्यावतीने 22 जुलै ते 28 जुलै दरम्यान जिल्हास्तरीय ऑनलाईन चित्र रेखाटन स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आयोजक भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी दिली आहे.
    या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोचे चित्र रेखाटन (पेन्सिल स्केच) करुन  7588524678 व 8983503777 या व्हाट्सएप नंबरवर पाठवावेत. या स्पर्धेत इयत्ता 11 वी ते पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र असतील, ड्रॉईंग पेपर A3 साईज असाणे आवश्यक आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. असेल. स्पर्धेचा निकाल 30 जुलै रोजी घोषीत करण्यात येईल. प्रथम पुरस्कार अकरा हजार, व्दितीय सात हजार तर तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये आहे. दिनांक 2 ऑगस्ट रोजी स्पर्धेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना एका कार्यक्रमात पारितोषीक देण्यात येणार आहेत.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *