क्राईम

वनविभागाच्या जमीनीतील भुखंड नावे करून देतो म्हणून फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-वन विभागाच्या जमीनीतील भुखंड नावाने करून देण्याचे आमिष दाखवून जवळपास 50 हजार रुपये रोख रक्कम लाटणाऱ्या दोघांविरुध्द ईस्लापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अरविंद उत्तम जाधव रा.वाळकी ता.किनवट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विनायक शंकर दुरपुडे आणि दिलीप किशनराव तुम्मलवाड या दोघांनी विनायक शंकर दुरपुडेच्या नावावरील वनक्षेत्राच्या जमीनीतील भुखंड आहे. त्याबाबत त्याची किंमत 49 हजार रुपये सांगून 45 हजार रुपये रोख घेतले. दिलीप किशनराव तुम्मलवाड हे वाळकीचे सरपंच आहेत त्यांनी 5 हजार रुपये अरविंद जाधवकडून घेतले आणि वनपरिक्षेत्रातील भुखंड तुमच्या नावे लावून देतो असे सांगितले. हा सर्व खोटारडा प्रकार उघड झाल्यानंतर अरविंद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ईस्लापूर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 66/2021 भारतीय दंडसंहितेच्या कलम 420,34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार केलवाड हे करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.