क्राईम

भु्रणहत्येसाठी आवश्यक असणारी औषधी बेकायदेशीर रित्या विकणाऱ्या एका महिलेसह पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-भु्रणहत्या करण्यासाठीचे औषध विक्री करतांना त्यासाठी आवश्यक असलेल्या अटींची पुर्तता न करता ते विक्री करणाऱ्या एका महिलेसह पाच जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही तक्रार अन्न व औषधी प्रशासन विभागाचे औषध निरिक्षक माधव जगन्नाथ निमसे यांनी दिली आहे.
औषधी निरिक्षक माधव निमसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.1 एप्रिलच्या सकाळी 10 वाजेल्यापासून ते 2 जुलैच्या दुपारी 11.30 वाजेदरम्यान मॅट्रो फार्मा, आशिषनगर, आशिर्वाद गार्डनच्या पाठीमागे या ठिकाणी मालती दिपक भोरगे, प्रकाश सुदाम लोखंडे, बुध्दानंद थोरात, मयुर बेलापूरे आणि मयुर लोले या पाच जणांनी डॉ.योगेश नरुटे, दिपक सरवदे, प्रितेश पाटील, वैशाली दाताळ, संध्या दाताळ आणि प्रणिता रेवणवार यांच्या नावे खोटे आणि बोगस मागणी पत्र बनवले आणि विक्री बिले सुध्दा खोटे बनवली. त्याद्वारे ए केअर किट या गर्भपाताच्या औषधाची विक्री अवैध रित्या स्त्रिभु्रण हत्या करण्याच्या उद्देशाने विक्री केली आहे असे औषध विक्री करतांना शासनाची मान्यता असलेले गर्भपात केंद्र त्या दवाखान्यातील स्त्रि रोग तज्ञ डॉक्टरांच्या लेखी मागणी नुसार देणे बंधनकारक आहे. निमयमांची पायमल्ली करून अवैधरित्या अशी विक्री करून मालती दिपक भोरगे, प्रकाश सुदाम लोखंडे, बुध्दानंद थोरात , मयुर बेलापूर, मयुर लोले यांनी रुग्णास आणि ग्राहकाच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले आहे.
भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 247/2021 कलम 34, 177, 336, 420, 468, 471 भारतीय दंडसंहिता आणि औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्यातील नियम 1945 मधील नियम क्रमांक 65(5), 65(9)(ब)नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक प्रशांत जाधव यांच्याकडे देण्यात आला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.