सात चोरी प्रकारांमध्ये सात लाख 87 हजार रुपयांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-प्राथमिक केंद्र सोनखेड येथे कार्यरत अधिपरिचारीकेची 1 लाख 42 हजार रुपये ऐवज असलेली पर्स दोन चोरट्यांनी पळवली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 6 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. नांदेड पोलीस दलाकडे दाखल झालेल्या एकूण 7 चोरी प्रकरणांमध्ये 7 लाख 87 हजार 169 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
मेघा प्रमोद निर्मल या 19 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आपली अधिपरिचारिकेची कामगिरी संपवून स्कुटी क्रमांक एम.एच.26 ए.ई.1958 वर बसून नांदेडकडे परत येत असतांना डेरला पाटीच्या समोर नर्सरी जवळ मोटारसायकलवर आलेल्या दोन लोकांपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने मेघा निर्मल यांच्याकडील बॅग बळजबरीने चोरली या बॅगमध्ये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा 1 लाख 42 हजारांचा ऐवज होता. सोनखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक परिहार अधिक तपास करीत आहेत.
अनिल तुकाराम गायकवाड हे कोल्हापूर जिल्ह्यातील ट्रक चालक दि.15 जुलै रोजी मध्यरात्री 2 ते सकाळी 7 वाजेदरम्यान धनेगाव चौक, लातूर फाटा येथे आपला ट्रक उभा करून झोपले होते. त्या दरम्यान ट्रकमधील स्पेअर पार्ट व मोबाईल असा 6 लाख 45 हजार 169 रुपयांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. 15 तारखेचा हा गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी 19 तारखेला दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक हंबर्डे अधिक तपास करीत आहेत.
गोदावरी उत्तमराव पाटील या उमरखेड येथून बसने हदगाव येथे आल्या. ही घटना 19 जुलै रोजीची आहे. त्यांना निवघा बाजार येथे जायचे होते. निवघा बाजार येथे पोहचल्यावर त्यांच्या लक्षात आले की, गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र कोणी तरी प्रवासादरम्यान चोरले आहे. या ऐवजाची किंमत 16 हजार 800 रुपये आहे. हदगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार हंबर्डे हे करीत आहेत.
प्रताप रंगनाथराव बोरकर यांच्या तक्रारीनुसार कासारखेडा ता.अर्धापूर येथील एका खाजगी मोबाईल टॉवरमधून 15 हजार रुपयांचे साहित्य 18 जुलै ते 19 जुलैच्या दरम्यान चोरीला गेले आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार हुंडे हे अधिक तपास करीत आहेत.
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणि लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन वेगवेगळ्या दुचाकी गाड्या चोरीला गेल्याची नोंद 20 जुलैच्या प्रेसनोटमध्ये आहे. या तिन्ही गाड्यांची किंमत 85 हजार रुपये आहे. याबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
