नांदेड

29 मार्चच्या घटनेसंदर्भाने दिल्ली गुरूद्वारा कमिटीचे अध्यक्ष सिरसा मंगळवारी पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची भेट घेणार

नांदेड (प्रतिनिधी)- 29 मार्चच्या घटनेसंदर्भाने दिल्ली शीख गुरूद्वारा कमिटीचे अध्यक्ष मनजिंदरसिंघ सिरसा यांच्यासह एका शिष्टमंडळाने आज महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली. हे सर्व शिष्टमंडळ उद्या नांदेडला येऊन पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांची भेट घेणार आहे. त्यानंतर 29 मार्चच्या घटनेत अडकलेल्या निष्पापांना कशी मदत करता येईल यावर चर्चा होणार असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.
29 मार्च रोजी घडलेल्या घटनेत पोलिसांनी जवळपास 28-30 लोकांना अटक केली आहे. ते सर्वजण सध्या तुरूंगात आहेत. काही जणांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालय दोन्ही जागी फेटाळण्यात आला आहे. या घटनेसंदर्भाने शीख समाजातील अनेक निष्पापांना या गुन्ह्याला सामोरे जावे लागले. या गुन्ह्याच्या प्रगती अहवालामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक नवनवीन प्रकार करून या गुन्ह्याच्या तपासात रंगत आणली. ती रंगत शीख समाजासाठी घातक ठरली. जवळपास चार महिने होत आले. न्यायालय अटकेत असलेल्या आणि अटकपूर्व जामीन मागणाऱ्यांना या प्रकारात काहीच दिलासा देत नाही.
या पार्श्वभुमिवर दिल्ली गुरूद्वारा शीख कमिटीचे अध्यक्ष मनजिंदरसिंघ सिरसा त्यांचे सहकारी सरबजितसिंघ विर्क, इंदरजितसिंघ मौंटी, विक्रमजितसिंघ रॉनी, ऍड. सरबजितसिंघ शाहू आणि ऍड. अमनपालसिंघ कामठेकर अशा शिष्टमंडळाने आज मुंबई येथे महाराष्ट्राचे दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली. 29 मार्चच्या घटनेत अडकलेल्या निष्पापांना मदत करा अशी मुख्य मागणी शिष्टमंडळाने केली. 29 मार्च रोजी ज्यालोकांनी घटना घडवली, ज्यांनी खरच तो गुन्हाकेला आहे त्यांना मदत करा असे आम्ही म्हणणार नाही, पणज्यांचीनावे यात गोवली गेली आहेत. त्यांना मदतीची अपेक्षा घेऊन आम्ही तुमच्याकडे आलो आहोत असे शिष्टमंडळाने सांगितले.
ऍड. अमनपालसिंघ कामठेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या शिष्टमंडळाला पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे पाठवले. संजय पांडे यांची भेट झाल्यानंतर त्यांनी नांदेडचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांना फोन करून या शिष्टमंडळासोबत चर्चा करा आणि त्यातून समाजाच्या हिताचा विषय लक्षात घेऊन कार्यवाही करा असे सांगितले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.