नांदेड

 शरदचंद्र पवार विधी महाविद्यालयावर भरमसाठ फिस वसुलीसाठी कार्यवाही करा; समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांचे स्वारातीम कुलसचिवांना पत्र 

नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड येथील समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांना एक पत्र पाठवले असून त्यानुसार शरदचंद्र पवार विद्यी महाविद्यालयाविरुध्द भरमसाठा फिस वसुल केली म्हणुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.
शितल महादेव क्षीरसागर या विद्यार्थिनीने  23 नोव्हेंबर 2020 रोजी समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात दिलेल्या अर्जाच्या संदर्भासह समाजकल्याण विभागाने स्वारातीम विद्यापीठाला दिलेले 27 नोव्हेंबर 2020 चे पत्र क्रमांक 6936 आणि 12 फेबु्रवारी 2021 ते पत्र क्रमांक 814 याचा संदर्भ लिहिण्यात आला आहे. त्यानुसार शितल क्षीरसागर यांनी शरदचंद्र पवार विधी महाविद्यालयात बीएसएल, एलएलबी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. ही विद्यार्थींनी   इतर मागासप्रवर्गातील आहे. समाजकल्याण विभागाकडून या विद्यार्थीनीला 50 टक्के शिष्यवृत्ती या अभ्यासक्रमासाठी मंजुर करण्यात आली आहे. तरी सुध्दा शरदचंद्र पवार महाविद्यालयाने जास्तीची फिस शितल क्षीरसागर यांच्याकडून घेतली आहे. या प्रकरणात दोन पत्रांच्या संदर्भानुसार महाविद्यालयाकडून खुलासा सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतू शरदचंद्र पवार विधी महाविद्यालयाने खुलासा संदर्भाने अंतिम नोटीस देवून सुध्दा शरदचंद्र पवार विधी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. त्यामुळे कुलसचिव स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने आपल्या स्तरावरून पुढील कार्यवाही करावी असे सहाय्यक आयुक्त समाजकल्याण नांदेड तेजस माळवदकर यांनी 19 जुलै रोजीच्या पत्रात स्पष्ट केले आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.