नांदेड (ग्रामीण)

उमरा व कौडगाव येथील आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबास चिखलीकर यांची आर्थिक मदत

नांदेड(प्रतिनिधी) – लोहा तालुक्यारील उमरा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली होती त्याच्या कुटुंबियास तसेच कौडगाव येथील  शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबियांचे युवा नेते व माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले.आणि त्यांच्या कुटुंबियास आर्थिक मदत केली.
लोहा कंधार तालुक्यातील व लोकसभा मतदारसंघातील  जनतेला  जिल्ह्याचे खा प्रतापराव  पाटील चिखलीकर व कुटुंबीयांनी नेहमीच मदतीचा आधार दिला आहे .कोरोना काळात मदतीला  भाजपा कार्यकर्ते व   चिखलीकर कुटुंब धावून गेले .वेळोवेळी सहकार्य केले जाते.
लोहा तालुक्यातील उमरा येथील शेतकरी भीमराव चांपती शिरसाट यांनी तहसील कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबियांचे  कंधार -लोहा चे युवा नेते जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी भेट दिली .कुटुंबाचे सांत्वन केले व स्वतः त्यांनी आर्थिक मदत दिली.तसेच मौजे कौडगाव (ता. लोहा) येथील शेतकरी  रामा प्रल्हाद भरकडे यांनी आत्महत्या केली होती आज त्यांच्या घरी जाऊन लोहा कंधार मतदार   युवा नेते  प्रवीणपाटीलचिखलीकर यांनी भेट दिली  त्यांचे सांत्वन केले  त्या  कुटुंबास  आर्थिक मदत  दिली   यावेळी  सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजी पाटील मारतळेकर,  पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील शिंदे  जि प सदस्य सुभाष गायकवाड,   माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सावळे ,प स सदस्य गुलाब पाटील उबाळे,कृउबा समिती सदस्य   शिवराज पाटील जोमेगावर ,तुकाराम पाटील हातनीकर, सुमेध गजभारे, केशव पाटील कौडगावकर, कामाज पा.कौडगावकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published.