नविन नांदेड(प्रतिनिधी)-योजना क्रं १ ते ४ मधील सिडको हाडको चे घरे हस्तांतरण करतांना सिडको च्या घरावर असलेली सर्व कर्ज माफी करावी अश्या मागणीचे निवेदन सिडको संघर्ष समिती सदस्य तथा माजी नगरसेवीका डॉ. करुणा जमदाडे यांनी आमदार मोहनरावजी हंबर्डे यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.
सिडको प्रशासनाने दिलेल्या योजना क्रं १ ते ४ अंतर्गत अनेक घरे देण्यात आली आहेत २००४ मध्ये ना .अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी सिडकोच्या घरावरील कर्जमाफी करून सिडको च्या नागरिकाना मोठा दिलासा दिला होता त्याच धर्तीवर हा निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनात केली आहे ,
२००४ ते २००५ या काळात केलेल्या पाठपुराव्याचे सर्व दस्तावेज सहीत निवेदन देण्यात आले असल्याचे निवेदनाद्वारे माजी नगरसेविका डॉ.करूणा जमदाडे यांनी केली आहे.
