नांदेड (प्रतिनिधी)-अर्धापूर येथे एक घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 86 हजारांचा ऐवज लंपस केला आहे. जंगमवाडी रस्त्यावरील एक घरफोडून चोरट्यांनी 24 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. नांदेड ग्रामीण आणि किनवट या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत 65 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. खुराणा ट्रव्हल्सजवळ एक मोबाईल चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. कुंटूर ता.कंधार येथून 69 हजार रुपये किंमतीची एक बैल जोडी चोरीला गेली आहे. या सहा चोरी प्रकारांमध्ये एकूण 4 लाख 47 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे.
सदाशिव शंकरराव मुळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे सांगवी ता.अर्धापूर येथील ते आणि त्यांचे शेजारी राहणारे त्यांचे काका 16 जुलै रोजी पहाटे 2 ते 5 या वेळेत झोपलेले असतांना कोणी तरी चोरट्यांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केाल आणि त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा 40 हजारांचा ऐवज आणि चुलत्याच्या घरातून 5 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिणे असा एकूण 2 लाख 86 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक सुरवसे हे अधिक तपास करीत आहेत.
विजय मारोतराव शिरसेवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 जुलैच्या सकाळी 6.33 ते 6.43 अशा 10 मिनिटाच्या वेळेत तीन चोरट्यांनी गोदावरी अर्बन मल्टीस्टेट क्रेडीट को.ऍप. बॅंक जंगमवाडी येथून इन्व्हटरच्या बॅटऱ्या 16 हजार रुपये किंमतीच्या व अग्नीशमन यंत्र 8 हजार रुपयांचे असा 24 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक रामभाऊ जाधव हे अधिक तपास करीत आहेत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लातूर फाटा, धनेगाव येनि राजेश गणेश घंटवार यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.आर.1588 ही गाडी 16 जुलैच्या मध्यरात्रीनंतर 2 ते पहाटे 5 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कदम हे अधिक तपास करीत आहेत.
आयुब खान अजिज खान पठाण यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एन.6781 ही 6 जुलै रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9.30 वाजेदरम्यान किनवट रेल्वे स्थानकातून चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 40 हजार रुपये आहे. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चौधरी अधिक तपास करीत आहेत.
दिपक बालाजी लुंगारे हे 16 जुलै रोजी सायंकाळी 5.30 हे खुराणा ट्रॅव्हल्ससमोरून पायी जात असतांना एका ऍटो चालक व ऍटोतील लोकांनी तुम्ही पायी का जाता ऍटोत बसा असे सांगत त्यांना ऍटोत बसवून घेतले. त्यांच्या खिशातील 3 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला. वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार शिंदे हे अधिक तपास करीत आहेत.
जालिंदर मारोती खंदाडे यांीन दिलेल्या तक्रारीनुसार 18 जुलै रोजी त्यांच्या लक्षात आले की, मौजे गुंटूर शिवारात त्यांच्या शेतातील आखाड्यावर बांधलेली एक बैल जोडी कोणी तरी चोरून नेली आहे. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुनिल पत्रे हे अधिक तपास करीत आहेत.