ताज्या बातम्या

कोवीड कालखंडात सुद्धा एसएससी परीक्षेत लातूर विभागात मुलीच पुढे

नांदेड (प्रतिनिधी)- लातूर शैक्षणिक विभागातील एसएससीचे 93.09 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्याचा निकाल 89.53 टक्के आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल 94.25 टक्के आहे. लातूर जिल्ह्याचा निकाल 96.51 टक्के आहे. निकालामध्ये सर्वाधिक निकाल लातूर जिल्ह्याचा आहे.
लातूर विभागातील 1 लाख 9 हजार 9 विद्यार्थ्यांनी एसएसचीच्या परिक्षेसाठी आवेदन पत्रे भरली होती. त्यात 1 लाख 7 हजार 773 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा देणाऱ्यांपैकी 1 लाख 326 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संख्या35 हजार 797 आहे. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 33 हजार 60 आहे. द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 23 हजार 994 आहे. उत्तीर्ण श्रेणीमध्ये 7 हजार 525 विद्यार्थी आहेत.
लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 96.51 टक्के आहे. 40 हजार 119 विद्यार्थ्यांपैकी  विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 16 हजार 990 आहेत. प्रश्रम श्रेणीमध्ये 12 हजार 880 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 7 हजार 155 विद्यार्थी, उत्तीर्ण श्रेणीमध्ये 1694 असे एकूण 38 हजार 719 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यातील 21 हजार 968 विद्यार्थ्यांपैकी विशेष प्राविण्यासह 7 हजार 969 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 7 हजार 52, द्वितीय श्रेणीत 4 हजार 527, उत्तीर्ण श्रेणीत 1156 असे 20 हजार 704 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
नांदेड जिल्ह्याचा निकाल 89.53 टक्के आहे. नांदेड जिल्ह्यातील 45 हजार 686 विद्यार्थ्यांपकी 10 हजार 838, प्रथम श्रेणीत 13 हजार 128, द्वितीय श्रेणीत 12 हजार 262, उत्तीर्ण श्रेणीत 4 हजार 675 असे 40 हजार 903 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
लातूर विभागातील 9 हजार 256 पुर्नपरिक्षार्थीमध्ये 9 हजार 87 विद्यार्थी उर्त्तीण र्झाले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात 67 टक्के पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्यात 68.29 पुर्नपरिक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर विभागात उर्त्तीण मुलांचे प्रमाण 91.08 टक्के आहे तर मुलींचे प्रमाण 95.46 टक्के आहे. नांदेड जिल्ह्यात 86.48 टक्के मुले आणि 92.99 टक्के मुली उर्त्तीर्ण झाल्या आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 92.10 टक्के मुले तर 96.64 टक्के मुली उर्त्तीण झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यात 95.53 टक्के मुले आणि 97.76 टक्के मुली उर्त्तीण झाल्या आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *