क्राईम

कोवीडचा फायदा घेऊन तुरुंगातून बाहेर आलेल्या गुन्हेगारांनी अनेक गुन्हे केले ; इतवारा पोलिसांनी दोघांना गजाआड केले;६५ लाखांची लूट केली होती

नांदेड,(प्रतिनिधी)- हवेत गोळीबार करून एकाची लूट करणाऱ्या दोन जणांना इतवारा पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे.कोरोना काळात एका खून प्रकरणातून तुरूंगातून सुटलेल्या गुन्हेगारांनी हा लुटीचा प्रकार केला आहे.पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी इतवारा गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.
दिनांक १५ जून २०२१ रोहित व्यंकट घुगले (२१) हे महिला बचत गटाची रक्कम घेऊन जात असतांना मदिनानगर मध्ये काही दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी त्यांना रोखून पिस्तुलातून हवेत फायरिंग करून त्यांच्याकडील ५६ हजार ७२७ रुपये रोख आणि एक मोबाईल ८ हजार रुपयांचा असा ६४ ७२७ रुपयांचा ऐवज लुटला होता. त्याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३१/२०२१ दाखल करण्यात आला.पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर धुमाळ,पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे पोलीस उप निरीक्षक गणेश गोटके,पोलीस अंमलदार विक्रम वाकडे,गंगाधर जाधव,हबीब चाऊस,धीरज कोमुलवार,शेख सत्तार आणि समीर अहमद यांनी घटना घडलेल्या ठिकाणच्या आसपासचे अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. त्यातून त्यांना दिसलेल्या अनेकांची तपासणी केली. अखेर पोलिसानी रोहितला लुटणाऱ्यांचा शोध लावलाच.
आज दिनांक १६ जुलै रोजी इतवारा पोलिसांनी त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार सय्यद अकबर उर्फ शेरू सय्यद गफ्फार रा.इस्लामपूरा नांदेड आणि त्याचा साथीदार सय्यद आझम सय्यद लाल अश्या दोघांना पकडले.या दोन आणि इतर दोन जणांनी मिळून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शिक्षकाचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.सध्या कोविद काळात त्यांना जामीन मिळाल्याने त्यांनी रोहितला तर लुटलेच सोबत इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा क्रमांक ९२/२०२१,१०८/२०२१ आणि १३१/२०२१ हे सर्व गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आज सय्यद अकबरला गुन्हा क्रमांक १३१/२०२१ मध्ये आणि सय्यद आझमला गुन्हा क्रमांक १०८/२०२१ मध्ये अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी इतवाराचे पोलीस उप अधीक्षक डॉ.सिद्धेश्वर भोरे,पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *