नांदेड

पिक विमा भरण्यासाठी 23 जुलै पर्यंत मुदतवाढ; खा: प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा यशस्वी पुढाकार

नांदेड (प्रतिनिधी)- चालू खरीप हंगामातील प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना विमा भरण्यासाठी 23 जुलैपर्यंत मुदत वाढ देण्यात आली असून ही मुदतवाढ मिळवून देण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव डवले यांच्याकडे यशस्वी प्रयत्न केला . शेतकऱ्यांच्या हितासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
नैसर्गिक आपत्तीतून पिकांच्या होणाऱ्या नुकसानभरपाईसाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये या उद्देशाने देशाचे कणखर नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली . प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ नांदेड जिल्ह्यातीलही हजारो शेतकऱ्यांना झाला आहे. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यानंतर पिक विमा योजनेतुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत असल्याने पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे . अशा परिस्थितीत यावर्षी खरीप हंगामाच्या पेरण्या संपल्यानंतर पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी वाढली होती. त्यातच गेल्या काही दिवसापासून नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पूर्णत कोलमडली तर वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्याने पिक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना अनंत अडचणी आल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा भरणे कठीण झाले पीक विमा भरण्यासाठी 15 जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील हजारो शेतकरी पिक विमा योजनेपासून वंचित राहणार होते .ही बाब खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर शेतकर्‍यांच्या हितासाठी त्यांनी तात्काळ केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव डवले यांच्याकडे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्यामार्फत पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. आपल्या मागण्यांचे निवेदन खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्र्याकडे पाठवले होते. शिवाय महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले होते . खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी या मागणीचा पाठपुरावा करत पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळवून घेतली आहे . आता 15 जुलै ऐवजी 23 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येणार आहे .त्यामुळे नांदेड जिल्ह्यात अनेक भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे . खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी वेळोवेळी शेतकरी आणि शेतमजूर यांच्या हितासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडे केलेल्या मागण्याचा पाठपुरावा यशस्वी ठरला आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील समृद्ध भारत आणि समृद्ध शेतकरी संकल्पना राबविण्यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न वारंवार केंद्र सरकारच्या पटलावर मांडले आहेत . त्यामुळे खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या या यशस्वी प्रयत्नाने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मात्र सुखावला आहे .
दरम्यान पिक विमा भरण्यासाठी मुदतवाढ देणाऱ्या केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव डवले , विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे तर या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी तातडीने केलेल्या सहकार्याबद्दल खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आभार मानले आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *