

नांदेड,(प्रतिनिधी)- ८ जुलै रोजी आमदुरा,शिकारघाट परिसरात झालेल्या ४७ वर्षीय माणसाचा खून करणाऱ्या दोन युवकांना मुदखेड पोलिसांनी आज गजाआड केले आहे.
८ जुलै रोजी शिकारघाट परिसरात धरमसिंघ उर्फ कालू मोहनसिंघ रामगढीया (४७) यांचा म्रुतदेह छामनबाई रामगढीया यांच्या टिनशेडमध्ये सापडला.त्यांच्या शरीरावर तलवारीच्या अनेक जखमा होत्या.धरमसिंघ उर्फ कालू मोहनसिंघ रामगढीया यांचे पुत्र प्रेमसिंघ रामगढीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुदखेड पोलिसांनी मारेकरी गुरुमुखसिंघ उर्फ पिंट्या भगतसिंघ रामगढीया रा.शिकारघाट आणि दीपक शंकरराव रापतवार रा.चिखलवाडी यांच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक १२५/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२,३२४,५०४,३४ आणि भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ नुसार दाखल केला.या गुन्ह्याचा तपास मुदखेडचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्याकडे होता.धरमसिंघ उर्फ कालू मोहनसिंघ रामगढीया यांच्या दुकानातून मटण खरेदी करून त्याचे पॆसे न देता उलट त्यांच्या पत्नीला जखमी केल्याच्या कारणाचा जाब विचारण्यासाठी धरमसिंघ उर्फ कालू मोहनसिंघ रामगढीया हे गेले होते आणि त्यांचा खून झाला होता.
मुदखेड पोलिसांनी धरमसिंघ रामगढीया यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला.आज १४ जुलै रोजी मुदखेडचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा,पोलीस अंमलदार विनायक मठपती,मनोज राठोड यांनी दोन्ही मारेकरी गुरुमुखसिंघ उर्फ पिंट्या भगतसिंघ रामगढीया रा.शिकारघाट आणि दीपक शंकरराव रापतवार रा.चिखलवाडी यांना गजाआड केले आहे.पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अधीक्षक गोपाळ रांजणकर,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी मुदखेड पोलिसांचे कौतुक केले आहे.