नांदेड(प्रतिनिधी)- नागरीकांचे गहाळ झालेले महागडे मोबाईल स्थानिक गुन्हा शाखेने पकडले आहेत. विविध पोलीस ठाण्यातील नोंदीप्रमाणे 51 मोबाईल स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले आहेत. त्याची एकूण किंमत 8 लाख 1 हजार 900 रुपये आहे.
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड शहरातून आणि जिल्ह्यातून सार्वजनिक ठिकाणातून, आठवडी बाजारांमधून मोबाईल गहाळ झाल्याच्या असंख्य नोंदी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या संदर्भाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या नेतृत्वात त्यांच्या पथकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील-8, भाग्यनगर-9, विमानतळ-5, इतवारा-3, नांदेड ग्रामीण-6, कंधार व देगलूर प्रत्येकी 1, वजिराबाद-18 असे एकूण 51 मोबाईल शोधून काढल ेआहेत. या मोबाईलची किंमत 8 लाख 1 हजार 900 रुपये आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी 51 मोबाईल शोधणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील चपळ पोलीस अंमलदार गोविंद मुंडे, शेख चॉंद,गंगाधर कदम, सखाराम नवघरे, संजय केंद्रे, दशरथ जांभळीकर, विश्र्वनाथ इंगळे, बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, बजरंग बोडके, गणेश धुमाळ, विलास कदम, राजेश सिटीकर आणि ओढणे यांचे कौतुक केले आहे.
