नांदेड(प्रतिनिधी)-अवैध वाळूचे ट्रक्टर पळवून नेल्याप्रकरणी नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांच्या तक्रारीनंतर एका व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्यक्तीने नायब तहसीलदार महिलेची बॅग सुध्दा चोरली होती.
हदगाव येथील नायब तहसीलदार स्नेहलता त्र्यंबकराव स्वामी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 6 जुलै रोजी दुपारी मौजे आडा शिवारात ता.हदगाव येथे त्यांनी आपल्या गाडीवर एका रेती ट्रक्टरचा पाठलाग करत असतांना ते रेती ट्रक्टर राम सखाराम शिंदे याने पळवून नेले. सोबतच नायब तहसीलदारांच्या गाडीतील त्यांची बॅग ज्यामध्ये 5 हजार 500 रुपये होते. ती बॅग सुध्दा चोरून नेली आहे. हदगाव पोलीसांनी या प्रकरणी रामसखाराम शिंदे विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 379 नुसान गुन्हा क्रमांक 176/2021 दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मोरे हे करीत आहेत.
