8 चोरी प्रकारांमध्ये 1 लाख 37 हजारांचा ऐवज लंपास
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका सेवानिवृत्त सैनिकाला लुटण्यात आले आहे. तसेच एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे. मारतळा येथील एक मेडीकल शॉप फोडण्यात आले आहे. मुखेड येथून एक ऍटो चोरीला गेला आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी गाडी आणि इतवाराच्या हद्दीतून एक मोबाईल चोरीला गेला आहे. या सर्व 6 चोरी प्रकारांमध्ये 1 लाख 36 हजार 890 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
सेवानिवृत्त सैनिक नंदराव शामराव केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जुलै रोजी सकाळी 11.45 वाजता ते सिडकोच्या मोंढा येथे ते अंबिका हार्डवेअर कौठा येथून घर बांधणीसाठी दोन क्विंटल गजाळी घेवून परत येत असतांना आयशा टावर्स सिडको येथे थांबून कागदपत्रांची झेरॉक्स काढण्यासाठी साक्षी मोबाईल शॉपीवर गेले. त्यावेळी ते पायी चालत असतांना एका काळ्या रंगाच्या दुचाकी गाडीवर नंबर नसलेल्या गाडीवर बसून दोन अनोळखी इसम आले आणि त्यांच्या काखेतील 12 हजार रुपये रोख रक्कम, कागदपत्र आणि 8 हजार रुपयांचा मोबाईल असा 20 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
विनोद बसप्पा पत्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जुलै रोजी रात्री 11 वाजता सरकारी दवाखान्याच्या उपहारगृहाजवळ त्यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 झेड.1149 उभी केली होती. ती 15 हजार रुपये किंमतीची गाडी 8 जुलैच्या सकाळी 6 वाजेच्या दरम्यान चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार भोसले अधिक तपास करीत आहेत.
शिवदास पुरभाजी सोनटक्के हे 10 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता मदीनानगर येथील जनावरांच्या दवाखान्यासमोर उभे असतांना कोणी तरी चोरट्यांनी त्यांचा व त्यांच्या मित्राच्या खिशातील दोन मोबाईल असा 30 हजार 890 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. इतवारा पोलीसांनी या बाबत गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार बिसाडे अधिक तपास करीत आहेत.
महेश सुदामराव सावळे यांचे मारतळा कापसी रस्त्यावर परमेश्र्वर मेडीकल दुकान आहे. 10 जुलैच्या रात्री 9 वाजता त्यांनी ते दुकान बंद करून घरी गेले. 11 जुलैच्या सकाळी 7.30 वाजता त्यांच्या मेडीकल दुकानाचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी 4 हजार रुपये रोख रक्कम चोरली आहे. तसेच मारतळा मार्केटमधील इतर तिघांच्या दुकानात चोरी झाल्याचे समजले असे तक्रारीत लिहिले आहे. उस्माननगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार केंद्रे अधिक तपास करीत आहेत.
विकास सुदामराव हेळगिरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जुलै रोजी 11 ते 11 जुलैच्या पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांचा ऍटो क्रमांक एम.एच.26 व्ही.6813 हा 40 हजार रुपये किंमतीचा ऍटो चोरीला गेला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार महेंद्रकर अधिक तपास करीत आहेत.
प्रविण लक्ष्मीनारायण भन्साळी यांनी आपली दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.जी.6402 ही 10 जुलै रोजी रात्री 9 वाजता शुभम मेडिकल राज कॉर्नर येथे उभी केली होती. रात्री 11 वाजता, दोन तासात ही 27 हजार रुपये किंमतीची गाडी चोरीला गेली आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार कानगुलकर अधिक तपास करीत आहेत.
