नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस दलात टायल 112 या पध्दतीनुसार महाराष्ट्र अपातकालीन सेवा ही योजना कार्यान्वीत करण्यात आली. या योजेसाठी नांदेड जिल्हा पोलीस दलात 31 जुलै पर्यंत 6 दिवसांचे प्रात्यक्षिक व पायाभुत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाला महेंद्रा डिफेन्स सिस्टीम लिमिटेडने सहकार्य केले आहे.
या प्रशिक्षणामध्ये जिल्ह्यातील नागरीकांना आपातकालीन परिस्थितीत पोलीस सेवा एकाच टोल फ्री क्रमांकावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी नागरीकांनी 112 क्रमांक टायल करायचा आहे. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकारातून 45 चार चाकी वाहने, 76 दुचाकी वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही वाहने गस्ती दरम्यान कोणत्या ठिकाणी आहेत हे जीपीएस प्रणालीच्या माध्यमातून समजणार आहेत. या प्रशिक्षणात पोलीस दलाने जनतेकरीता तात्काळ सुविधा उपलब्ध कशी करून द्यायची आहे हे सांगितले जात आहे. एका तुकडीमध्ये 80 पोलीस अंमलदार दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 6 दरम्यान प्रशिक्षण घेत आहेत. हे प्रशिक्षण 6 दिवसांचे आहे. 520 पोलीस अंमलदारांना हे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. त्यात आजपर्यंत 256 पोलीस अंमलदारांना हे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावाड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे आणि पोलीस अंमलदार शेख शमा गौस यांनी या प्रशिक्षणाचे नियोजन केले आहे.
