नांदेड

कांही तासाच्या पावसाने रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पाडले

नांदेड(प्रतिनिधी)-11 जुलै रोजी पडलेल्या पावसाने महानगरपालिकेचे पितळ अनेक जागी उघडे पाडले. त्यात बाफना टी पॉईंटजवळ जवळपास 30 फुट लांब एक खड्डा पडला आहे. ज्यामुळे या भागातील वाहतुक विस्कळीत झाली आहे. गुत्तेदारांचे घर भरण्यासाठी महानगरपालिका वेगवेगळ्या युक्त्या लढवत असते आणि त्यातून  हा दुर्देवी बांधकाम प्रकार पावसाच्या झटक्याने उघड पडला आहे.
काल दि.11 जुलै रोजी कांही तासांमध्ये जवळपास 8 इंचापेक्षा जास्त पाऊस पडला. शहरात व जिल्ह्यात सोबत आसपासच्या जिल्ह्यात पावसाने वाईट परिस्थिती तयार केली. ज्या ठिकाणी कधीच पाणी साचत नव्हते अशाही ठिकाणी कालच्या पावसाने तळे तयार केले. त्यामुळे जनतेला त्रासाला सामोरे जावे लागले. काल दुसऱ्यावेळेचा पाऊस पडून संपेपर्यंत अंधार पडला होता. त्यामुळे आज 12 जुलैचे पहाट झाल्यानंतर बाफना रस्त्यावर झालेली रस्त्याची दुरावस्था समोर आली.
बाफना रस्ता हा बसस्थानकाकडून हैद्राबादकडे जाणारा रस्ता आहे. तसेच बाफना टी पॉईंटपासून जुन्या मोंढात अवजड वाहनांना येण्याचा रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ मोठीच असते. काल पडलेल्या पावसाने या रस्त्याच्या कामातील योग्यतेचे पितळ उघडे पडले आहे. एक हाती सत्ता असणाऱ्या महानगरपालिकेत सर्व सामान्य जनतेच्या भौतिक  सुविधांसाठी उत्कृष्ठ काम होण्याची अपेक्षा होती. पण कालच्या पावसाने सर्व पितळ उघडे पडले आहे. बाफना रस्त्यावर पडलेल्या खड्याचे अवलोकन केले असता त्यामध्ये सिमेंट कमी आणि वाळू जास्त दिसते. रस्त्याच्याखाली  ज्या तांत्रिक पध्दतीने रस्त्याचे काम होणे अपेक्षीत आहे. त्यातील एकही काम पुर्णपणे झाले नाही, ते त्यात खड्यातच दिसते. या खड्यामुळे कोरोडोची बिले उचलणाऱ्या गुत्तेदारांनी कामामध्ये केलेल्या गोंधळाचा पर्दा फाश झाला आहे. या रस्त्यावरील वर्दळीला ब्रेक लागणे अवघड आहे. त्यामुळे या रस्त्यावर एखादी मोठी दुर्घटना होणार नाही असे म्हणता येणार नाही आणि दुर्घटना झालीच त्याचा जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर तर अवघडच आहे.
Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *